पान:गोगलगाईचे पंख.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दवबिंदू बागेत एका फुले फुलली लाल निळी पांढरी पिवळी आकाशातून पाहिले एके दिवशी नाजूक परीने फुले ती सुंदरशी हसत खेळत अवतरली अवनीवरती उडत बागडत सगळीकडे ती होती रोज रोज येत राही ती बागेत परिच्या सख्याही आल्या रांगेत इकडून तिकडे दंगामस्ती खेळ रंगला लपाछपी काळवेळाची त्यांना नाही तमा रात सरली मावळला चंद्रमा गुलाल उधळला प्राचीवरती पन्या आल्या मग भानावरती निरोप त्या फुलांचा घेताना दूरदेशी सोडून त्यांना जाताना आसवांचे मोती ओघळले पानांनी अलगद झेलले गेल्या दूरदूर पन्या झाल्या अदृश्य त्या सान्या आसू राहिले मागे पानांवरती तेच तर दवबिंदू असती 71