पान:गोगलगाईचे पंख.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आपलंच झोपडं बरं... सगळेच खेळतात चेंडू फळी झुलतात डुलतात झोपाळ्यावरी हसतात इकडे तिकडे लपतात चालते त्यांची धराधरी मला वाटेनाच खेळावे तूच दिसते डोळ्यापुढे तुझा दुरावा सोसवेना आई तुझ्याविना करमेना तू जाते जरी कामाला राहीन गं एकटाच झोपडीत ठेव तुझ्याच जवळ मला रात्रीचा तरी झोपेन तुझ्या कुशीत रोज तुझ्या हातचा घास खाईन मी सुका शिळा मन लावून अभ्यास करीन खूप शिकेन शाळा सुधारगृह नको गाहे कळतंय आता आपोआप आपलंच झोपडे बरं आहे नाही देणार तुला ताप 70