पान:गोगलगाईचे पंख.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हा काव्यसंग्रह ६६ कवितांचा आहे. मुलांसाठी या वेगवेगळ्या प्रकारच्या ६६ चॉकलेटसारख्याच आहेत. हा बौद्धीक खाऊ मुलाना नक्कीच आवडेल. बालसाहित्यातील कविता या वाङमय प्रकाराबाबत स्थिती अशी असते की, मुलांच्या वयोगटानुसार त्यांची आकलनक्षमता, ग्रहणशक्ती, अभिरुची बदलत असल्यामुळे वयोगटास अनुसरून तशी रचना करावी लागते. शिशु अवस्थेतील बालकांना लयतालाच्या अनुषंगानेच कविता आवडतात. शिवाय अनुप्रासयुक्त किंवा द्विरुक्त शब्द त्यांना जास्त आकर्षित करतात. म्हणून तर "अडगुलं मडगुळं, सोन्याचं कडगुळं..." ही कविता लहान मुलांना ऐकवतात. शब्दार्थाशी फारसा संबंध नसतो.. पुढील अवस्थेत मात्र दृश्य घटक, परिसर, यातील घटक व त्यासंबंधी शब्द यांची आवड मुलांमध्ये निर्माण होते. नववी- दहावीपर्यंत काव्याशयाबाबत. मुले चांगली समजदार होतात. या संग्रहातील काही कवितांचे असेच वर्गीकरण करता येईल. मात्र त्याचं वर्गीकरण न करता कविता आहे त्याच क्रमाने मुद्रित केल्या आहेत. “निसर्गातील निरागसतेला" तुम्ही या कविता अर्पण केल्या आहेत. ही अर्पण पत्रिका अत्यंत प्रयोजक आहे. पहिली कविता 'आरती' आहे. मग येते 'नीलम परी' तिच्या पाठोपाठ आलेला 'ढंप्या ढोल' 'मुलांना खूपच आवडेल. अभ्यासात रमणारा तरिही खोडकर 'गुणी बाळ' मुलांना आपल्यातलाच एक वाटेल. मुले जास्ती प्रश्न विचारतात ते आईला, 'सांग ना गं आई' असं विचारून भंडावून सोडतात. अमावास्येला चंद्र कुठे जाई बाई अशी रास्त शंका या कवितेत मूल विचारत आहे. मुलांना प्राणीपक्षी तर खूपच आवडतात. मग या कवितेतील बदकाची जोडी खुणावत आहे. या कवितेत ताल, लय यात मुलांना गुंगवून ठेवतात. तुमच्या या बालगीतांमध्ये कोंबडीचं, क्वॉक क्वॉक आहे. कावळ्याची, काव काव आहे. ताईचं निसर्गचित्र बघताना निघालेले आश्चर्योद्गार अबब ~! आहेत. बालपण या कवितेत बालपणाची सगळी बागडमस्ती छान छान शब्दात व्यक्त केली आहे. दिवसभर हुंदडत बागडत .... बॅट फिरवून फुशारकी मारत.... वाहत्या पाण्यात रपारपी खेळत... धापा टाकून खात खात... दंग होऊन मग स्वप्नांच्या राज्यात आईच्या कुशीत झोप घेत... बाळाचा सगळा दिनक्रम प्रत्ययकारी रितीने या कवितेत मांडला आहे. 'Childhood is nothing but God's gift to humanity ओळींची आठवण ही कविता वाचल्यावर होते. , या प्रसिद्ध आंग्लकवी शेलीच्या मुलांच्या आवडीनिवडी, त्यांचे स्वभावविशेष, त्यांच्या वागण्यातील विविध रंगछटा निरनिराळ्या कवितांतून व्यक्त झाल्या आहेत. मुलांना शाळेमध्ये न्यावा लागतो. डब्यात काय द्यायचं असा प्रश्न मुलांच्या आईला नेहमीच पडतो. शाळा तर नेहमीच सांगते ..डब्यात पोळीभाजी द्या. आणि मुलं म्हणतात, रोज पोळीभाजीच का? हे 6