Jump to content

पान:गोगलगाईचे पंख.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

झाडांना ओढ आकाशाची गच्च हिरव्या पानांतूनी डोकावते हळूच कुणी उमलले फूल वेलीवरी हरखून झाले नाचरी नाजूक पाकळ्या गडद गुलाबी पिवळे पराग डोले मधोमधी नसे वेडावणारा गंध जरी असे रंग हा नयनमनोहारी धडपड त्यांची झेलण्या रश्मींना पानांचा हा अडसर सरेना आच त्यांना राहे प्रकाशाची ओढ झाडांना आहे आकाशाची 60