पान:गोगलगाईचे पंख.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना डॉ. न. म. जोशी १०१३ सदाशव पेठ, गंधाली. पुणे-३० मो. ९२२६५७५२९० सौ. सावित्री जगदाळे स्नेहपूर्वक आशिर्वाद "तांबडं फुटलं" या तुमच्या कुमार बाल काव्यसंग्रहाला मी प्रस्तावना लिहावी अशी विनंती डॉ. दिलीप गरूड यांच्या द्वारा केली होती. ही तुमची विनंती मी मान्य केली. याचं कारण असं की, तांबडं फुटलं या तुमच्या साहित्यकृतीच्या द्वारा तुमच्या साहित्यिक जीवनक्रमात तांबडं फुटलं असेल तर त्याचा साक्षीदार मला या प्रस्तावनेच्या रुपानं होता येणार आहे. आता तुम्ही या काव्यसंग्रहाच्या दुस-या आवृत्तीच्या निमित्ताने तांबडं फुटलं या ऐवजी 'गोगलगायीचे पंख' असं नाव ठेवू इच्छिता आहात. तांबडं फुटलं हे नाव चांगलं आहे. तरी मुलांच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं नवं नावं 'गोगलगायीचे पंख' असं आहे. हे नाव खूपच अर्थपूर्ण आहे. गोगलगायी हा मंद चालणारा प्राणी आहे, पण महत्त्वकांक्षेचे पंख लावले तर तिलाही पंख फुटू शकतात. हा संदेश मुलांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. प्रेरणादायी आहे. याच नावाची कविता या संग्रहात आहे. तीमध्ये याच भावना प्रतित झाल्या आहेत. कष्ट करा धीर धरा नाही कुणाला अपाय इच्छाशक्तीने घडले चमत्कार नाही कष्टाला पर्याय या ओळी किती आशयघन आहेत, याचा प्रत्यय लहान थोर वाचकांना होईल. कष्ट करा आणि धीर धरा असं तुम्हाला सुचवायचं आहे. कष्ट केलं की लगेच यश मिळेलच असं नाही. तर धीर धरा. इच्छाशक्तीने चमत्कार घडलेत. आजची वैज्ञानिक प्रगती आपण पाहतो ती शाश्त्रज्ञांच्या कष्टामुळे आहे. हा चमत्कार अथक . श्रम, इच्छाशक्तीशिवाय कसे काय साध्य झाला असता बरं । तुम्हाला छोट्या दोस्तांना कष्टाचा हा संदेश द्यायचाय तो तुम्ही अतिशय नाविन्यपूर्ण अशा प्रतिमेत दिला आहे. म्हणूनच ही कविता महत्त्वाची आहे. पुढे जिद्दीचे जगणे ठाम चाल गोगलगायीला ही लागतात पंख महत्त्वकांक्षेची गगनभरारी गळाले पाठीवरचे शंख आपण जर जिद्दीने, ठामपणे चालत राहून महत्त्वकांक्षेची गगनभरारी घेऊ तर, असेच आपल्या पाठीमागचे अडचणींचे लचांड आपोआप गळून पडते. हा संदेश तुमचा मोठ्यांनाही प्रेरणादायी ठरतो. 5