पान:गोगलगाईचे पंख.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सुट्टी परीक्षा संपली सुट्टी लागली करू धमाल मिळून सगळी झाडावर चढून कैऱ्या तोडू आंबटतुरट कराकरा फोडू जोतीबाच्या डोंगरावर चढून जाऊ जाता जाता करवंदं खाऊ दुध दही खाऊन धष्टपुष्ट होऊ सायकल चालवून पेट्रोल वाचवू घालू सूर्यनमस्कार अन् जोर बैठका फोडायच्या मग तुपातल्या खारका दुपारच्या वेळी वाचू गोष्टी गोड टी. व्ही. चं ठेवू जरा बाजूला वेड भेळपुरी पाणीपुरी पचवू दाबेलही त्यासाठी पिळदार बॉडी हवीच झालेली अशी घालवू सुट्टी सारी गुणांची वाढेल टक्केवारी 56