पान:गोगलगाईचे पंख.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

का? कोण म्हणतं झाडाला सदा तू राहा वाढत ऋतुबरोबर बदलत पानगळ करीत करीत वसंतात राहा बहरत ऊन पाऊस सोसीत खोलवर मुळे रुजवीत राहा सावली देत कोण सांगते पक्षाला तू जमव काडीकाडी बांध घरटे पिलांसाठी घेई त्यांनी गगन भरारी निभवायला हवी जबाबदारी कोण सांगते प्राण्यांना पायात येईतो बळ छोट्या पिलांना सांभाळ प्राणाची बाजी लावून करा त्यांचे रक्षण माणसाला मात्र सगळेच सांगावे लागते शिकवत शिकवत घडवावे लागते का? ? ? 55