पान:गोगलगाईचे पंख.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रोहितची दुर्बिण शेजारी बागेत आंब्याचे झाड करकरीत कैऱ्यांनी लगडले अर्जुन रोहित कान्हाच्या तोंडाला पाणी सुटले आधी पाहणी टेहळणी नीट हवी करायला त्यासाठी शक्तीमान दुर्बिण तात्यांना सांगू आणायला वशिला लावला माईकडे द्या त्याला दुर्बिण आणून.. पक्षीनिरीक्षण करेल पोर आकाश निरीक्षणाने होईल थोर तात्यांनी मग आणली दुर्बिण जरी खिशाला बसली चाट रोहित बसला टेहळणी करीत काय वर्णावा त्याचा थाट कुठे कुठे लागल्या कैन्या पाहून साऱ्या लक्षात ठेवल्या :

मित्रांना घेऊन भराभर तोडल्या तिखट मिठ लावून पोटभर खाल्ल्या শ 54