पान:गोगलगाईचे पंख.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उल्केचा वर्षाव आकाशगंगेत हिरे भरले खचाखच पाणी वाहायचे झाले बंदच जलदेवता रुसून बसली तारांगणे काळजीत पडली रुसवे यांचे काढायचे कसे तुंबलेले पाणी वाहायचे कसे सगळे गेले जलदेवाकडे घातले त्यांनाच सर्वांनी साकडे सांगा सांगा उपाय आम्हाला कसे करावे मोकळे पाण्याला आम्हा काही सुचेना तुम्हीच मार्ग काढा ना जलदेव म्हणाले हे हिरे एवढे कमी करा थोडे थोडे. करा वर्षाव खाली नी वर मोकळे होतील जलधर ..... वाहील गंगा खळाळत :: चमकत लहरत हसत खेळत 42