पान:गोगलगाईचे पंख.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मनी बांधतोय घाट शाळा सुरू झाली नव्या पुस्तकाचं नावीन्य महिनाभरात जुनं झालं आता मिळवायला हवं प्रावीण्य चाचणी आली कधी अभ्यासाची भरली धडकी कळलंच कसं नाही अंगात आली कडकी बाबांनी मात्र घेतलंय डोक्याला टेन्शन भलंतच अभ्यासाचं लावलंय टुमणं तरी मन टी. व्ही. कडे वळतंच टी. व्ही. बघता बघता लागतेय झोप गाढ सकाळी उठवत नाही हाती धरवत नाही बाड गणपती गेले... दसरा आला सहामाही संपण्याची बघतोय वाट दिवाळीच्या सुट्टीत कसा बांधायचा किल्ला याचेच मनी बांधतोय घाट 41