पान:गोगलगाईचे पंख.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सालभर दिवाळी दिवाळी संपली आकाशकंदिल काढू देईना फटाके संपले तरी फराळ काही संपेना ढीगभर लाडू न् चकल्या डबाभर चिवडा कोणी खाईना की मलाच सारखे खा खा दिवाळी खाऊन आलाय कंटाळा केवढा कधी करेल झणझणीत सांबार वडा शाळा सुरू होऊन अभ्यासाचा भार वाढला आईनं लाडवांना नवीन प्रकार करू घातला असली दिवाळी सालभर चालते बाबांच्या खिशाला चाट पडते जोड माझ्या तर तोंडाची चवच जाते आईची मग किरकिर सुरू होते किती करते कष्ट तुमच्यासाठी तुम्हाला मात्र किंमत नाही 39