पान:गोगलगाईचे पंख.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तरुलता नाजूक सुंदर तरुलता दवबिंदूमधे भिजूनी थंडीत गोठणाऱ्या तरिही येता बहरूनी पावसाशी खेळ खेळता चिंब चिंब भिजूनी वादळी भोवंडणाऱ्या तरिही येता बहरूनी चांदण्याची शाल पांघरता धुक्याचा घुंगट घेऊनी शिशिरात पाने गळणाऱ्या तरिही येता बहरूनी ग्रीष्माचे चटके खाता चैत्री कोवळीक पालवूनी वसंत फुलवणाऱ्या उन्हात येता बहरूनी 37