पान:गोगलगाईचे पंख.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शुभाशीष सोनियाचा दिवस आनंद मजेचा वाढदिवस आज माझ्या ज्योतीचा आई करेल गोड गोड खाऊ का घालील पाठीत धम्मक लाडू नाना म्हणतील हवा कशाला ड्रेस अशीच दिसतीस सुंदर बेस ताई काढील बारीक चिमटे म्हणेल हॅपी बर्थ डे बेंबटे पाटीवरची पेन्सिल भैय्या आणील पाहून ज्योती खूश होईल मैत्रिणी मागतील कॅडबरी गोळ्या ज्योती देईल चापट-पोळ्या मामा म्हणतील कसला वाढदिवस सगळे असतात कामाचेच दिवस गुडघे चोळीत चिडवेल आजी लग्नाला आली बाय माझी मावशींची येईल कविता छोटी फुलपाखरासारखी बागडेल ज्योती शुभाशीष अनेक मिळतील तिला जीवेत् शरदः शतम् प्रार्थना प्रभूला 34