पान:गोगलगाईचे पंख.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एक पान हलत डुलत एक पान हलत डुलत माझ्याशी मजेने खेळत ना... ना...हो...हो... करत गप्पा आमच्या छान चालत सूर्यकिरणे येतात बागडत वारा येतो झुलत झुलवत पाखरांबरोबर शीळ घालत गाणी त्यांची ऐकत ऐकत चांदोबाची गंमतजंमत ढगांची शिवाशीव पाहात वीज झळकते दणकत आभळी फटकारे मारत पावसाचे हात अनंत मायेने चिंब भिजवत एकाच ऋतुचे आयुष्य जगत वाढत वाढत पान जाते पिकत पालवीला करून मोकळी जागा एक पान हलत डुलत गळून पडते झाडाच्या नकळत माझ्याशी मजेने बोलत... 33