पान:गोगलगाईचे पंख.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बालपण दिवसभर हुंदडत बागडत टाकूनी चेंडू फिरवूनी बॅट फुशारकी मारीत कधी रंगात येऊनी खेळे लपाछपी वाहत्या पाण्यात चाले रपारपी धावत पळत येऊनी पाणी पितसे ढसाढसा धापा टाकीत बसूनी खातसे कसाबसा मन भरून खेळून वळतो अभ्यासाकडे मोठ्याने म्हणत कविता पाठ धडे अखंड धावपळ आला शिणवटा अनावर झोपेच्या थोपवेनात लाटा मिटू लागल्या नयनपाकळ्या भराभर अथक भिरभिर भिरणारे ते नेत्रभ्रमर अडकले पापण्यांच्या दलात अलगद आईच्या कुशीत झोपला बाळ शांत दंग असे स्वारी स्वप्नात भटकण्या जाई परराज्यात क्षणात विलसे स्मितहास्य ओठात निरागसता फुलते गोड चेहऱ्यात 30