पान:गोगलगाईचे पंख.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ताईचं निसर्ग चित्र लाल लाल कौलारू घरे हिरवे गार शेजारी मळे अब बS भले मोठे वडाचे झाड काही कळेना पारंब्या की खोड लालभडक गुलमोहर पिवळाजर्द बहावा पळस फेकतो आगीच्या ज्वाळा करंजाच्या शुभ्र कळ्यांचा पडला सडा कडूसर वास येतोय ना थोडा थोडा माड निघालेत उंचच उंच गगना झावळ्यांनी पालवतात सूर्यकिरणांना रखरखीत डोंगरावर झाडांचे खर्राटे ताई चित्रात मारतेय फर्राटे 29