पान:गोगलगाईचे पंख.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वाढू दे जाणिवा वाढदिवस आज सानुल्याचा हर्षभरला दिस आनंदाचा नवनवीन योजना आखतो सखेसोबती अनेक जोडतो जुन्यांचीही आठवण ठेवितो उत्साहाने अती ओसांडितो चोहिकडे तोषचि सांडितो पसंतीस उतरलेला पोशाख वर्णावा काय त्याचा दिमाख निरंजनाने करिता औक्षण चमकतात हसरे नयन औक्षवंत हो रे माझीया बाळा माझेही आयु लाभू दे तुजला वयासोबत वाढू दे जाणिवा नकोच काढू कुणाच्या उणिवा ठेवू नको कशाची अपेक्षा नको करू कुणाची उपेक्षा अपयशाच्या सोसताना झळा भोवती फुलव मायेचा मळा त्यागातून उमलू दे आयुष्य दे निरामय मिळेल दीर्घायुष्य 23 23