पान:गोगलगाईचे पंख.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सांग ना गं आई सांग ना गं आई ' तांबडं फुटलं म्हणजे गं काय रात्र संपते पहाट होते आकाश होते केसरी गुलाबी जणू फुटलंय आभाळ झालंय तांबडं लाल सांग ना गं आई सूर्याला ग्रहण कसे लागते बाई सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो चांदोमामा सावली पडते पृथ्वीवर त्यालाच म्हणतात लागले ग्रहण सांग ना गं आई अमावस्येला चंद्र कुठे गं जाई सूर्याबरोबर उगवतो चंद्र असतो आकाशी अंधारी बाजू पृथ्वीकडे असते म्हणून दिसत नाही डोळ्यांशी सांग ना गं आई..... 22