पान:गोगलगाईचे पंख.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घरची शाळा रोजच शाळेत जायचं आईला सोडून दिवसभर राहायचं स्वतःच डबा उघडून खायचा घरचा अभ्यासही लिहून काढायचा आईची कित्ती मज्जा असते तिला कुठे जायची घाई नसते आम्हाला शाळेत हाकलते आपण घरात निवांत बसते वाटतं रोजच असावी सुट्टी. मग आईशी जमेल गट्टी घरीच भरावी शाळा भिंतीवर कापडी फळा बाबा शिकवतील गणित इंग्रजी आई घालेल पाढे गाणी ताई सांगेल नकाशातील गमती दादा घेईल करून पक्की भूमिती शूर शिवाजीचा वाचून इतिहास देशसेवेचा घेईन ध्यास गांधीजींचे स्वावलंबन करीन त्याचे घरीच पालन नको रिक्षात बसायला कोंबून शाळेत दाटीवाटीनं अवघडून घरीच असावी अशी शाळा. भिंतीवर टांगलेला कापडी फळा 21