पान:गोगलगाईचे पंख.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गुणी बाळ खेळ खेळतो सैनिकाचा लेफ्ट राइट परेड करतो तोंडाने बंदुकीचा ठोठोs आवाज काढीत असतो कागदाचे विमान करीत हवेत भिरकावितो शाळेत जाईन यामध्ये बसून म्हणीत असतो जेव्हा तेव्हा हातवाऱ्यांनी बॉलींग करीत असतो हातात नसली बॅट तरी घरातच क्रिकेट खेळतो मैदानावर फुटबॉल खेळता खेळता घराचे मैदान करतो ताईची खोडी काढता काढता स्वतःच रडत असतो दुसऱ्यांची कागाळी करता करता हळूच हसत असतो दंगामस्ती चाले दोघांची • सारे घर डोक्यावर घेतो दमुनभागून पळत घरी धापा टाकीत येतो भूक भूक करून आरडाओरडा करतो गुणाचा बाळ थोडे खाऊन अभ्यासात रमतो 17