पान:गोगलगाईचे पंख.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कढीपाल्याचे खमंग रोप कढीपाल्याचे रोप नाजूकवाणी कुंडीत लावले अंगणी गडद हिरवा रंग पानोपानी पोपटी पालवी गोजिरवाणी एकेका फांदीची चढती भाजणी हिंग - ताकाचे त्याला पाणी येईल मग बहरुनी भरलीय रुची त्याच्या पानोनानी सैपाकात लावील वर्णी खमंग होईल आईची फोडणी तोंडा सुटेल सर्वांच्या पाणी अंगत पंगत रंगली अंगणी बाबांनी वाढले आग्रह करुनी पोट भरले आमटी भुरकुनी 15