Jump to content

पान:गोगलगाईचे पंख.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पान हलतंय लुटूलुटू बाळ बघतंय टुकूटुकू ढंप्या ढोल पानांचा आवाज सळसळ पाणी वाहातंय खळखळ छताला लटकलंय मोठं डूल नंदीबैलावर पांघरली रंगीत झूल झन्याचं पाणी झुळझुळ पाखरांची गाणी मंजूळ मंजूळ डब्यात पैसा खुळखुळ बाळाच्या वाटीत दाणे न गूळ दुडूदुडू धावताना जातोय तोल पुटूपुटू पडताना डोळ्यात ओल ढंप्या ढोल गंप्या गोल बोबडं बोबडं बंट्या बोल 14