पान:गृह आरोग्य.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७) व्हिनेगार व मसाल्याचे मिश्रण पुरचुंडीत बांधून गरम पल्पमध्ये ठेवा व उष्णता चालू ठेवा. (८) उकळून ६० अंश ब्रिक्स पर्यंत पाणी आटवा. (९) थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. (१०) टोमॅटो सॉस तयार. विशेष माहिती : टोमॅटोमध्ये सुद्धा पेक्टीन असते. टोमॅटो चिरडल्यावर त्यात एन्झाईम असतात, ती सक्रीय होऊन पेक्टीनचा नाश करतात. पेक्टीनचे प्रमाण जास्त असल्यास सॉस घट्ट होतो, पाणी जास्त आटवावे लागत नाही. यासाठी टोमॅटो न कापता शिजवतात व एन्झाईम नष्ट करतात. त्यामुळे पेक्टीन राहते व गर घट्ट होतो. चमच्यात थंड करून पुरेसे घट्ट होईल तेव्हा गरम स्थितीत बाटलीत पूर्ण भरतात व टोपण घालून उलटे करून ठेवतात. गरम व्हिनेगारमुळे जीवाणू व बुरशी मरतात. व्हिनेगार अन्न संरक्षक म्हणून वापरतात. सॉसला चांगली चमचमीत चव असते. आकर्षक रंग व त्यातून पाणी वेगळे होता कामा नये. चांगले सॉस बाटलीत वरच्या बाजूला काळे होत नाही. उपक्रम : आपल्या परिसरातील विविध फळांपासून पदार्थ बनवा. उदा. लिंबू (लोणचे), सिताफळ (सिताफळबर्फी), आंबा (अंबाबर्फी), आवळा (मोरावळा) इ. दिवस : तिसरा प्रात्यक्षिक : खवा निर्मिती करणे, प्रस्तावना : भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतातील बहुसंख्य लोक हे शेती व्यवसाय करतात. त्याचबरोबर शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन हा व्यवसाय केला जातो. भारतामध्ये दूध उत्पादनात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. तसेच या दुधापासून अनेक वेगवेगळे पदार्थही बनविले जातात. उदा. बटर, तूप, खवा, दही, पेढे, श्रीखंड असे विविध पदार्थ हे बनविले जातात. मानवी आहारात इतर अन्नघटकांबरोबरच दुधालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. दूध हे नाशवंत असल्यामुळे ते जास्त दिवस टिकवून ठेवण्यासाठी खवा हा पदार्थ दुधापासून तयार करतात. तर आज आपण खवा कशाप्रकारे करतात हे पाहूया. पूर्व तयारी : (१) दूध आणून ठेवा (२) सर्व साहित्य जमा करा (कढई, कलथा, चिनीमातीची बशी इ.) शिक्षक कृती: (१) दूध अगोदर आणावे. (२) खवा भट्टीवाल्याची पूर्वपरवानगी घेणे.(प्रकल्प भेट ठरल्यास) (३) कामाचे विभाजन गटात करून घ्या. (४) दुधाची फॅट म्हणजे काय? उपक्रमाची निवड करणे : (१) जवळच्या खवा निर्मिती भट्टीस भेट देऊन अधिक माहिती गोळा करा. (२) गाय, म्हैस, शेळी याच्या दुधापासून खवा तयार करून त्याचे निरीक्षण करा. (३) खवा तयार करून त्यापासून विविध पदार्थ तयार करून विक्री करा. उदा. पेढे, कुंदा इ. अपेक्षित कौशल्ये : (१) दूध एकसारखे हलवता येणे. (२) खव्यापासून विविध पदार्थ तयार करता येणे. (३) खवा तयार झाला हे ओळखता येणे.(चाचणी) (४) उष्णतेचे प्रमाण योग्य ठेवता येणे. (तापमान मोजता येणे.) साधने : कढई, कलथा, स्टोव्ह, चिनी मातीची बशी, काडीपेटी, केरोसीन, पक्कड, इ. साहित्य : दूध.