पान:गृह आरोग्य.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कृती: (१) प्रथम स्टोव्हमध्ये रॉकेल मोजून भरा. (२) स्टोव्ह पेटून घ्यावा. (३) त्यावर कढई ठेवा. (४) कढईमध्ये दूध मोजून टाका. (५) मंद उष्णतेवर दुधाला एकसारखे हळुवारपणे कलथ्याच्या साहाय्याने हलवा. (६) दूध घट्ट होऊ लागल्यास त्यामध्ये चिनीमातीचे भांडे सोडा. (७) दूध असे हलवा की दूध करपणार नाही. (८)खवा तयार झाल्यावर कढईला उष्णता देणे बंद करा. (९) कढईतील खवा दुसऱ्या भांडयात काढून ठेवा. विशेष माहिती: (१) खव्यापासून आपण मिठाईचे विविध पदार्थ तयार करू शकतो. उदा. पेढे, कुंदा इ. (२) दूध सौम्य तापमानावर एकसारखे हलवून अटवून घेणे. (३) चिनीमातीचे भांडे आटत्या दूधात ठेवल्यामुळे दूध खाली करपत नाही. (४) म्हशीच्या १ लीटर दुधापासून १८० ग्रॅम खवा मिळतो. (५) म्हशीच्या दुधामध्ये जास्त फॅट असल्यामुळे खवा जास्त प्रमाणात तयार होतो व त्याची प्रत उत्तम असते. फ्लो चार्ट : खवा तयार करण्याचा फ्लो चार्ट काढा. किंमत काढणे : एक लीटर दुधापासून खवा तयार करण्यासाठीची किंमत ठरवा. उपक्रम : (१) खवा तयार करणाऱ्या उद्योगास भेट द्या. (२) दूध डेअरीस भेट द्या. (३) पॅकेजिंग व मार्केटींगचा अनुभव घ्या. (४) गाईचे दूध काढण्याचा अनुभव घ्या. दिवस : चौथा प्रात्यक्षिक : फळांपासून जॅम, जेली तयार करणे, (अ) जॅम तयार करणे: प्रस्तावना : भारतामध्ये अनेक फळांचे उत्पादन होते. परंतु सर्व भागात सर्वच फळे उपलब्ध होत नाहीत. तसेच फळे टिकवून ठेवणे जास्त अडचणीचे होते. ठराविक ऋतुमध्ये ठराविक फळे उपलब्ध असतात. तसेच ही फळे वर्षभर आपणास उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे कधीही फळे खाण्याचा आनंद मिळविण्यासाठी जॅम ही संकल्पना पुढे आली. ज्या काळात फळे उपलब्ध असतात त्या काळात त्यापासून जॅम तयार करून तो जास्त दिवस साठवून ठेवता येतो. ब्रेडसोबत जॅम मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. पूर्व तयारी : (१) बाजारातून हंगामानुसार जे फळ उपलब्ध असेल त्यातील उत्तम दर्जाची फळे घ्यावीत. (२) जॅम तयार करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य व साधने एकत्रित करावीत. शिक्षक कृती :(१) जॅम तयार करण्यासाठी आवश्यक फळांची निवड कशी करावी हे विद्यार्थ्यांना सांगणे. (२) फळे वाहत्या पाण्यात का धुवावीत हे विद्यार्थ्यांना सांगणे. (३) फळाच्या फोडी कशा कराव्या हे सांगणे. (४) फळ किती वेळ शिजवावे व शिजवण्यासाठी पाणी किती प्रमाणात असावे हे विद्यार्थ्यांना सांगणे. (५) जॅम तयार झाला आहे की नाही हे पाहण्याच्या योग्य कसोट्या विद्यार्थ्यांना शिकविणे (६) विद्यार्थ्यांना कॉस्टींग व फ्लो चार्ट काढता येणे. उपक्रमाची निवड :(१) सफरचंदाचा जॅम तयार करून विक्री करणे. (२) पपईचा जॅम तयार करून विक्री करणे. (१) विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे फळ निवडता येणे. (२) विद्यार्थ्यांना जॅमचे पॅकेजिंग करता येणे.