पान:गृह आरोग्य.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(ड) शिवणकाम - शिवणयंत्राचा वापर उद्देश : शिवणयंत्राच्या (मशीन टीप) मदतीने रुमालाचे काठ शिवणे व तयार रुमालाची विक्री किंमत ठरविणे. अपेक्षित कौशल्ये : विद्यार्थ्याला शिवणयंत्राच्या प्रमुख भागांची नावे व त्यांची कार्ये माहिती समजणे, शिवणयंत्र वापरून कापडावर मशीनटीप घालता येणे, शिवणयंत्रावर शिवताना कापड योग्य ताण ठेऊन सरकवता येणे. साहित्य : १ मीटर x १ मीटर मापाचे कापड, मशीनची सुई, कपड्याच्या रंगानुसार योग्य रंगाचा मशीन शिलाईचा पक्का दोरा माहिती : शिवणयंत्राचा प्रत्यक्ष उपयोग करण्यापूर्वी त्याच्या भागांची ओळख करून घेणे आवश्यक आहे. (१) सुईपट्टी - या पट्टीवरील छिद्रातून सुई खाली जाऊन दोरा घेऊन वर येते. (२) सरकपट्टी - ही पट्टी सरकवून सुईपट्टीच्या खालील भाग दिसतात. (३) फीड डॉग – या दातेरी पट्ट्या कापड पकडून सरकवतात. (४) दाबपट्टी/घोडा - ही पट्टी कपड्यावर वरून दाब देते. (५) सुई (६) सुईचा क्लँप (७) सुई बसवण्याचा गज (८) दोऱ्याला ताण देण्याचा स्क्रू (९) लिव्हर - दोरा खाली-वर खेचण्यासाठी (१०) रिळासाठी दांडी (११) टाक्यांची लांबी कमी जास्त करण्याचा स्क्रू (१२) बॉबीन भरण्यासाठी भाग (१३) चाक कृती: (१) दिलेल्या मापाच्या कापडाचे चारही काठ दुहेरी दुमडून धावदोऱ्याचे मोठे टाके घालून कच्ची शिलाई करा. (२) शिवणयंत्राच्या दाबपट्टीखाली रुमालाचा दुमडलेला काठ असा ठेवा की दुमडलेली बाजू वर येईल व जास्तीचे कापड डाव्या बाजूला राहील. (३) टाक्यांची लांबी कमीजास्त करण्याच्या स्क्रूच्या मदतीने मोठे टाके घातले जातील असे setting करा व चाक फिरवून यंत्राला गती द्या. (४) एक काठ शिवून झाल्यानंतर दुसऱ्या काठासाठी पूर्वीपेक्षा कमी लांबीच्या टाक्यांचे setting ठेवा व दुसरा काठ शिवून घ्या. (५) अशाच प्रकार तिसरा व चौथा काठ क्रमाने कमी लांबीच्या टाक्यांचे setting ठेवून शिवा. दक्षता व काळजी: (१) पातळ कापडावर खूप बारीक टाके घातले तर ते कापड गोळा होत जाते. म्हणून पातळ कापडासाठी मोठे टाके घालावेत. (२) तसेच जाड कापडावरची शिवण टिकून राहावी यासाठी बारीक टाके घालावेत. शिक्षक कृती : अपेक्षित कौशल्ये आत्मसात होतील आणि वेळ, साहित्य व पैसा यांची बचत होईल, आपापल्या परिसरात उपयोगी वस्तू तयार होईल या दृष्टीने शिक्षकांनी कल्पनाशक्ती वापरून प्रात्यक्षिकांमध्ये बदल करावा. उदा. हातशिलाईसाठीच्या टाक्यांचा सराव करता यावा यादृष्टीने पिशवी शिवण्याचे प्रात्यक्षिक येथे दिले आहे, परंतु या टाक्यांचा सराव करता येईल अशा इतर अनेक उपयोगी वस्तू तयार करता येतील. एका प्रात्यक्षिकातील वस्तू दुसऱ्या प्रात्यक्षिकासाठी वापरल्यास साहित्याचा खर्च कमी करता येईल. प्रात्यक्षिक