पान:गृह आरोग्य.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बारीक धाव (क) शिवणकाम - कपडे दुरुस्ती उद्देश : रफूव ठिगळ करून कपडे दुरुस्ती करणे. अपेक्षित कौशल्ये : कापड फाटण्याच्या प्रकारानुसार रफू अगर ठिगळ यांची निश्चिती विद्यार्थ्याला करता येते, बारीक व सारख्या मापाचा धावदोरा व हेमचे टाके घालता येतात. साहित्य : रफू व ठिगळ करण्याजोगे फाटलेले कापड, बारीक सुई, कपड्यांच्या रंगानुसार योग्य रंगाचा हातशिलाईचा पक्का दोरा. आकृती: ठिगळाचा तुकडा ठिगळ हेम फाटलेला भाग आतील धावदोरा बाहेरील धावदोरा हेम कृती : रफूः (१) फाटलेल्या भागाभोवती १ सेंमी. रुंदीचा आकार आखून घ्यावा. (२) त्याच कापडाच्या दोऱ्याने /योग्य रंगाच्या दुसऱ्या दोऱ्याने या आकारात बारीक धावदोरा घाला. ठिगळ : (१) फाटलेल्या भागाची आतील कडा कात्रीने नीट कापून घ्यावी व सुटे दोरे काढून टाकावे व तो भाग साधारण वर्तुळाकार करून घ्यावा. (२) फाटलेल्या भागापेक्षा जरा जास्त मापाचा त्याच कापडाचा तुकडा किंवा त्याच रंगाच्या दुसऱ्या कापडाचा तुकडा कापून घ्यावा व त्याची कडा हेम घालून बंद करून घ्यावी. फाटलेला भाग संपूर्णपणे व्यवस्थित झाकला जाईल अशा पद्धतीने हा तुकडा फाटलेल्या भागावर ठेवून आतील बाजूने बारीक धावदोरा घालून कापडावर बसवावा. (४) दर्शनी बाजूने फाटलेली कडा आत दुमडून बारीक हेम घालून बंद करावी व हेमच्या सभोवती बाहेरून बारीक धावदोरा घालावा. दक्षता व काळजी : रफूसाठी धावदोरा घालताना फाटलेला भाग सरळ राहील, गोळा होणार नाही ही काळजी घ्या. शिक्षक कृती : (१) रफू व ठिगळासाठी नवीन कापड घेऊन फाडून त्यावर रफू किंवा ठिगळ शिकवण्यापेक्षा जुने फाटलेलेच कापड दुरुस्त करता येईल. (२) रफू व ठिगळाप्रमाणेच शिवण उसवलेल्या कपड्यांची दुरुस्ती, तुटलेली बटणे व काजे दुरुस्त करून देणे, जुन्या मोठ्या कपड्यांतून छोटे कपडे तयार करून देणे, या कामातूनही व्यवसाय उभा राहू शकतो. ही कल्पना विद्यार्थ्यांना द्यावी. माहिती: (१) खिळ्यास किंवा काट्याला अडकून कापड फाटते, तेव्हा ते साधारणपणे काटकोनात फाटते. अशाप्रकारे फाटलेल्या भागावर रफू करतात. (२) झिजून किंवा अन्य कारणाने कापडाचा काही भाग निघूनच गेला असेल तर त्या ठिकाणी ठिगळ लावतात. (३) रफू किंवा ठिगळ करण्यासाठी त्याच कापडाचा एका बाजूचा धागा काढून शिलाईसाठी वापरावा. विद्यार्थी कृती: (१) रफू व ठिगळ करण्यासाठीही मजुरी मिळू शकते. या कामाची बाजारातील किंमत ठरवताना या कामातील कसब व त्यासाठी लागणारा वेळ लक्षात घ्या. ६३