पान:गृह आरोग्य.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

'अ' मध्ये हातशिलाईने कापडी पिशवी शिवण्याची कृती दिली आहे. तशाच प्रकारे शबनम पिशवी, गांधी टोपी, चंची इ. वस्तू शिवणयंत्राच्या मदतीने शिवता येतील. जरा डोके चालवाः कापडाच्या कडा का दुमडतात? विद्यार्थी कृती: . कापड शिवता यायला लागल्यावर जुन्या कपडयांतून वेगवेगळ्या वस्तू शिवून पहा. पपेट /कठपुतळीच्या कापडी बाहुल्या बनवण्यास शिकवता येईल. पंचतंत्रातील /इसापच्या गोष्टीमधल्या एखाद्या गोष्टीतली पात्रं, प्राणी यांच्या कापडी बाहुल्या बनवून छोटीशी नाटुकली बसवा. शिवणकामासाठी वापरावयाचे साहित्य : शिवणयंत्राद्वारे शिवणकाम करताना आकृती कर्तन करणे, शिवणकाम करणे, इस्त्री करणे, हुक्स /बटणे लावणे इ. कृती कराव्या लागतात. त्यास विविध साहित्य अपेक्षित असते. अ) टेबल : अखंड फळीचे गुळगुळीत पृष्ठभाग असलेले १२० सें.मी. उंची असलेले ९० सेंमी x १०० सेंमी लांबी-रुंदीचे टेबल वापरावे लागते. ब) काटकोन : लाकडी व विविध धातू किंवा प्लास्टिकचे काटकोन कापडावर आकृती काढताना वापरतात. कात्री : कर्तनाकरिता २५ ते ३० सेंमी लांबीची कात्री वापरतात. ही कात्री लोखंडी व पोलादाची असते. या कात्रीची एक मूठ गोल व दुसरी लंबवर्तुळाकार असते. शिंप्याचा खडू : हे खडू चपटे, चौकोनी, मेणयुक्त असतात. विविध रंगात हे खडू मिळतात. या खडूचा वापर केल्याने आकृती वळणदार येते. फ्रेंच कर्व्ह (वळण पट्टी) : गळा, मुंढा, बाजूचे आकार इ. निरनिराळ्या प्रकारची वळणे या पट्टीमुळे देता येतात. या पट्टीची लांबी २२ सेंमी असते. फ) फुटपट्टी : या पट्टा १५ सेंमी ते ६० सेंमी. लांबीच्या असतात. या लोखंडी, लाकडी / प्लास्टिकच्या असतात. सरळरेषा जोडण्यासाठी या पट्टीचा उपयोग होतो. स्केल त्रिकोण : कर्तन करण्यापूर्वी वहीवर प्रमाणबद्ध आकृत्या काढण्यासाठी करतात. घ) टाचण्या : सिल्क, रेशमी कापड, कर्तन करताना सरकते, ते सरकू नये म्हणून अणकुचीदार व बारीक टाचण्या लावून कर्तन करतात. च) तपकिरी रंगाचा कागद : (ब्राऊन पेपर) हा कागद चिवट असतो. नेहमी जे कपडे शिवावे लागतात त्याची पेपर कटिंग करून ठेवल्यास वेळेची बचत होते. छ) इस्त्री : चुरगाळलेले /घड्या पडलेले कापड सरळ करण्यासाठी, शिवण नीट बसण्यासाठी कापडाला इस्त्री करावी लागे. कपड्यांच्या दुमडपट्ट्या इस्त्री करून चांगल्या प्रकारे शिवता येतात. अशाप्रकारे शिवणकामात वरील साहित्य-साधने आवश्यक असतात. आकलीन शिवणयंत्राची व त्याच्या सुट्ट्या भागाची मूलभूत माहिती : शिवणयंत्राचा शोध इंग्लंडमध्ये इ.स.१७९० साली मिस्टर सॅमस सेंट याने लावला. प्रत्यक्षात १८४०सालामध्ये शिवणयंत्र फ्रान्समध्ये सुधारणा करून नवीन मशीन तयार केले. शिवणयंत्राचे प्रकार तीन आहेत : (१) पायमशीन (२) हातमशीन (३) विजेच्या साहाय्याने चालणारे मशीन