पान:गृह आरोग्य.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दक्षता व काळजी: (१) एका रंगाचा दोरा सुईत ओवल्यानंतर शक्यतो त्या रंगाचे सर्व ठिकाणचे भरतकाम पूर्ण करून घ्यावे. यामुळे सुईमधला दोरा वारंवार बदलावा लागत नाही व दोरा वाया जात नाही. (२) कापडातून सुई खाली घेतल्यानंतर डाव्या हाताचे पहिले अथवा मधले बोट सुईला खालून आधार देण्यासाठी वापरावे. त्यामुळे छोटे टाके घालता येतात. त्या बोटावर सुई सतत टोचली जाते व खूप काम केल्यानंतर जखमही होऊ शकते. म्हणून या बोटावर स्टीलचे टोपण किंवा 'अंगुस्तान' घालतात. (३) दोरा संपल्यास किंवा भरतकाम संपल्यास कापडाच्या मागील बाजूस दोऱ्याला गाठ मारावी. (४) शक्यतो शिलाई करण्यापूर्वी भरतकाम करावे. शिक्षक कृती: (१) शिवणाऱ्याच्या उजव्या बाजूस बसू नये व शिंकणाऱ्यांच्या डाव्या बाजूस बसू नये या म्हणीचा अर्थ सांगून मराठी भाषेतील अशाच इतर गंमतीदार म्हणी शोधण्यास सांगाव्या. (२) सुईचे भाग दाखवावेत. शिवणाची सुई व शिवणयंत्राची सुई यांच्या नेढ्यातील फरक सांगावा शिवणयंत्राची सुई: • सुईमध्ये सिंगल दोरा ओवणे व डबल दोरा ओवणे यातील फरक सांगा. भरतकाम करताना शक्यतो सिंगल दोरा का ओवतात? माहिती: नेढ़े व टोक दोऱ्याची किंवा रेशमाची लड म्हणजे अनेक बारीक बारीक धाग्यांना पीळ देऊन तयार केलेला पीळदार दोरा. १) साखळीचा टाका २) फुलीचा टाका : प्रत्येक फुलीचा फक्त एकाच दिशेने दिसणारा तिरका भाग प्रथम भरावा. आकृती३ ३) संपूर्ण लांबीपर्यंत एका बाजूचा तिरका भाग भरून झाल्यानंतर दुसऱ्या दिशेने दिसणारा दुसरा तिरका भाग भरून प्रत्येक फुली पूर्ण करावी. 7 ४) फुलीचा टाका योग्य पद्धतीने भरल्यानंतर मागील बाजूने असा दिसतो. आकृती ४ आकृती ५ ५) साखळीचा टाका सुटा सुटा घातल्यास गव्हाचा टाका तयार होतो. ज्या भरतकामाच्या मागील बाजूस कमीत कमी दोरे दिसतात ते उत्तम काम समजतात. कारण अशा भरतकामात रंगीत दोऱ्यांचा जास्तीत जास्त भाग दर्शनी भाग सजावटीसाठी वापरलेला असतो. भरतकाम केलेल्या वस्तूचा आतील भाग जास्त हाताळतो व आतील बाजूला कमीतकमी दोरे असल्यास भरतकाम उसवत नाही. जरा डोके चालवा: • भरतकामासाठी बारीक सुई का वापरावी? विद्यार्थी कृती (IT): • साखळीचा टाका व फुलीचा टाका घालता येईल अशी एखादी नक्षी संगणकातील Paint च्या मदतीने काढून छापा.