पान:गृह आरोग्य.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अणकुचीदार टोक असते. दुसऱ्या व्यक्तीला सुई देताना नेढ्याची बाजू दुसऱ्याकडे करून द्यावी. साधारणपणे शिवताना उजव्या हातात सुई व डाव्या हातात कापड धरले जाते. कापडातून सुई वर ओढून काढताना शिवणाऱ्याच्या उजवीकडे वरच्या दिशेने सुई ओढली जाते. म्हणून शिवणाऱ्याच्या उजव्या बाजूस बसूनये. (४) काजासाठीच्या कटची लांबी बटणापेक्षा कमी ठेवावी. शिक्षक कृतीः (१) पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्लॅस्टिक पिशव्यांपेक्षा कापडी पिशवी जास्त चांगली कशी हे विद्यार्थ्यांना या निमित्ताने समजावून सांगता येईल. (२) प्लॅस्टिक पिशव्यांसाठी २० मायक्रॉन जाडीची फिल्म वापरल्यास असे प्लॅस्टिक पुन्हा वापरता येते. परंतु त्यापेक्षा कमी जाडीची प्लॅस्टिकची फिल्म पुन्हा वापरता (Recycling) येत नाही, हे प्लॅस्टिक कुजत नाही, किंबहुना, त्याचे छोटे छोटे तुकडे होत राहतात व ते वाऱ्यावर उडून सर्वदूर फैलावतात. पर्यावरणाची हानी होते. (३) जुन्या कपड्यांतून कापडी पिशव्या शिवता येतात. बाजारात त्यांना चांगली मागणी असते. बाजाराच्या ठिकाणी प्लॅस्टिक पिशवी उपलब्ध नसल्यास पटकन कापडी पिशवी विकत घेतली जाते. गि-हाईकाची ही मनोवृत्ती लक्षात घेऊन कापडी पिशव्या विक्रीसाठी दुकानात ठेवण्याकडे दुकानदारांचाही कल असतो. हा व्यावसायिक दृष्टिकोनही विद्यार्थ्यांसमोर मांडावा माहिती: सुयांचे प्रकार : मध्यम सुई, जाड सुई, दाभण, गजऱ्याची सुई, शिवणयंत्राची सुई, क्रोशाची सुई, विणकामाच्या सुयांची जोडीइ. दोऱ्याचे प्रकार : कच्चा दोरा, ६० नंबरचा कच्चा दोरा, शिवणयंत्रासाठी पक्का दोरा, गोधडीसाठी जाड दोरा, गजऱ्याचा जाडदोरा, सुतळी इ. साधारणपणे कच्च्या शिवणकामासाठी धावदोरा, पक्क्या कामासाठी टीप किंवा उलटी टीप, दर्शनी भागाच्या कडा दुमडण्यासाठी हेम वापरतात. _शक्यतो आधी सुलटी टीप शिकावी व नंतर उलटी टीप शिकावी. विद्यार्थी कृती : (१) या प्रात्यक्षिकाच्या आधारे शबनम पिशवी, चंची, इ. अनेक वस्तू तयार करून पहा. (२) कापड, दोरा, बटण, गुंडी इ. साहित्याची किंमत + साहित्य - किमतीच्या १५% मजुरी + साहित्य - किमतीच्या १०% नफा+साहित्य किमतीच्या ३०% इतर खर्च + साहित्य-किमतीच्या १०% भावातील चढउतारासाठी तरतूद = विक्रीची किंमत या पद्धतीने तयार पिशवीची बाजारात विक्री किंमत निश्चित करा. (ब) शिवणकाम - भरतकाम उद्देश : भरतकामासाठी टाक्यांचा सराव-पिशवीवर भरतकाम करणे व तयार वस्तुची विक्री किंमत ठरवणे (फुलीचा टाका व साखळीचा टाका.) अपेक्षित कौशल्ये : (१) फुलीचा टाका व साखळीचा टाका घालता येणे, (२) फुलीचा टाका व साखळीचा टाका यांची नक्षीकामामध्ये योग्य ठिकाणी योजना करता येणे. (शिवण्यापूर्वी पिशायींचा साहित्य : कापड, भरतकामासाठी बारीक सुई, योग्य रंगसंगतीनुसार रेशमी किंवा सुती रंगीत दोऱ्यांच्या लढ्या इ. कृती:(१) आकृतीत दाखविल्याप्रमाणे पिशवीच्या मुख्य भागावर नक्षी काढून घ्या. (२) रंगीत दोरा/रेशमाच्या लडीतील ६ बारीक धागे घेऊन भरतकामाच्या सुईमध्ये ओवा व एका टोकास गाठ मारा. (३) योग्य ठिकाणी फुलीचा टाका व साखळीचा टाका घाला.