Jump to content

पान:गृह आरोग्य.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४) (६) (३) कात्रीच्या साहाय्याने कापडाचे ६ इंचx ६ इंच मापाचे तुकडे (जेवढी गटात मुले तेवढे) करा. मुलांना प्रत्येकी एक तुकडा द्या व तुम्ही सुद्धा कापडाचा एक तुकडा घ्या. प्रत्येकाल सुईद्या व प्रत्येक मुलास १ मीटर दोरा द्या. सुरुवातीला कडा ५ एम.एम. मोजून घेऊन मुडपून टाके कसे टाकावे हे तुम्ही तुमच्या रुमालावर (कपड्याच्या तुकड्यावर) करून दाखवा. (७) मुलांना करण्यास सांगा व तुम्ही त्यांना मदत करा. (८) सर्व मुलांना सोबत टाकेटाकून पुढे नेण्याचा प्रयत्न करा. (९) कापडाच्या कडा मुडपून झाल्यावर तुम्ही प्रत्येक मुलाचा रुमाल पहा. (१०) आता रुमालामध्ये तुम्ही हेम टाका. हेम वापरून डिझाईन कशी करायची ते दाखवा. (११) मुलांकडून तशी डिझाईन करून घ्या. (१२) डिझाईन करण्यापूर्वी पेनने ती डिझाईन आखून घ्या. (१३) अशाप्रकारे तुम्ही प्रात्यक्षिक दिवसभरात घ्यावे. संदर्भ :(१) शि.ह.पु(Vi), इ.९वी, पान नं.२१०,२११ (२) झारापकर शिवणशास्त्री भाग १, पान नं.१३ ते १७. (अ) शिवणकाम शिलाईच्या टाक्यांचा सराव उद्देश : शिलाईसाठीच्या टाक्यांचा सराव – (उलटी टीप, धावदोरा, काजाचा टाका व हेम), पिशवी शिवणे व तयार पिशवीची विक्री किंमत ठरविणे. अपेक्षित कौशल्य : उलटी टीप, धावदोरा, काजा टाका व हेम या टाक्यांच्या सुबक शिवणी घालता येणे. साहित्य : मीटर रुंद व१मीटर लांबीचे कापड,हातशिलाईसाठी सुया,६० नंबरचा कच्चा दोरा, बटण /सुताची गुंडी कृती: (१) मीटर रुंद व १ मीटर लांबीचे कापड घ्या. (२) १ मीटर लांबीच्या मध्यभागी कापड दुमडून त्यावर आकृतीत दाखवल्याप्रमाणे पिशवीचा आकार काढा. (३) हातात धरावयाच्या बंदाच्या दोन्ही कडा हेम घालून दुमडा. (४) मुख्य आकाराच्या दोन्ही कडा धावदोरा घालून शिवा व पिशवी उलटी करून घ्या. त्यामुळे शिवणाची बाजू आत जाईल व दोरे उसवणार नाहीत. (५) संपूर्ण शिवणपट्टीवर उलटी टीप घाला व शिवण पक्की करा. (६) पिशवीच्या तोंडाच्या ठिकाणी आकृतीत दाखवल्याप्रमाणे बटण किंवा सुताची गुंडी शिवा. बटणाच्या बरोबर समोर येईल अशा पद्धतीने समोरच्या बाजूवर काजासाठी १ सेंमी. लांबीचा कट घ्या. या कटवर काजाचा टाका अशा पद्धतीने घाला की काजाचे दोरे उसवणार नाहीत. उपयुक्त कल्पना : कमी वेळात, कमी श्रमात, कमी खर्चात पिशवी, रुमाल बनविणे. घरातून बाहेर जाताना कापडी पिशवी घ्यायला आपण विसरतो. हातरुमाल मात्र आठवणीने खिशात असतो. अडचण होऊ नये म्हणून हा एक पर्याय. तसेच सोप्या पद्धतीने पिशवी बनविणे. १५'x २०" आकाराचे सुती कापड घ्यावे त्याला एक घडी घालावी म्हणजे आता १५"x१०" आकार तयार झाला. दोन कडांना टीप घालावी. वरच्या मोकळ्या भागावर लांबट गोल कापून घ्यावा. ३"X १.५" आकाराचा गोल भाग कापवा. त्याची कडा शिवून घ्यावी. पिशवी उलटी करावी. घडी-२०" शिलाई - १०" काप दक्षता व काळजी : (१) शिवणकामाचा सराव करण्यासाठी नवे कापड वापरण्यापेक्षा जुन्या कपड्यातून योग्य त्या मापाचा तुकडा कापून घ्यावा. (२) शिवणाच्या सुईच्या एका बाजूस दोरा ओवण्याचे नेढे व दुसऱ्या बाजूस ६०