पान:गृह आरोग्य.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माहिती १. रिबिंग स्टिच - रिब (Rib) म्हणजे बरगडी किंवा फासळीचे लांब हाड/काडी. या टाक्यांमुळे विणकामामध्ये लांब लांब काड्या किंवा सळ्यांसारखी नक्षी दिसते. २. छोट्या रिबिंग स्टिचमधील उभ्या सळ्या कमी ३. मोठ्या रिबिंग स्टिचमधील उभ्या सध्या रुंदीच्या असतात. जास्त रुंद असतात. ४. टाक्यांची संख्या सम असली तर एक सुलट एक उलट टाके घातल्यामुळे रिबिंग स्टिच तयार होते. ५. टाक्यांची संख्या विषम असली तर एक सुलट एक उलट टाके घातल्यामुळे 'सीड स्टिच' तयार होते. जरा डोके चालवा : मोठ्या रिबिंग स्टिचसाठी ३ टाके सुलट व चौथा टाका उलट, पुन्हा पुढचे ३ टाके सुलट व त्यानंतरचा १ टाका उलट अशाप्रकारे वीण घेतली तर डिझाईन कसे दिसेल? दिवस : आठवा प्रात्यक्षिक : शिवणीचे काज्याचा टाका व हेम वापरून रुमाल बनविणे. प्रस्तावना : दैनंदिन जीवनात रोजच्या वापरामध्ये कपड्यांना फार महत्त्व आहे. कपडे फक्त अंगावर घालणे नसून तर ते आता फॅशन स्वरूपात झाले आहेत. आजकाल अनेक वेगवेगळी डिझाईन ही दोऱ्याच्या माध्यमातून कपड्यांवर येऊ लागली आहेत. अशा प्रकारची जी डिझाईन (एम्ब्रॉयडरी) असतात ती मशीनवरसुद्धा करता येते. तसेच ते हाताने सुद्धा अतिशय चांगल्याप्रकारे करता येते. पूर्वतयारी: (१) कापड व कात्री आणून ठेवा. (२) दोरा व सुई आणून ठेवा. उपक्रमांची निवड करणे: (१) हातरुमाल तयार करणे अपेक्षित कौशल्य : (१) हेम टाका व काज्याचा टाका घालता येणे. (२) सर्व टाक्यामधील अंतर सारखे येणे. (३) दोऱ्यांचे प्रकार समजणे, (४) सुईचे प्रकार समजणे. विशेष माहिती: काजाचे टाके : कोटिंग कापडाला १० नंबरचा व शर्टिंग कापडाला २० नंबरचा दोरा काजास वापरावा. नेहमीच्या वापरातील ४० नंबरचा दोरा काजाला वापरावयाचा असल्यास त्याला पीळ दुहेरी करावा व त्यावर मेणबत्ती चोळावी म्हणजे तो एकजीव होईल. लोकरीच्या कपड्याला काजा करताना ट्वीस्ट दोरा वापरणे योग्य होय. हेम टाका : (तुरपाईचे टाके)(हेमिंग स्टिचेस) गळपट्टी, तळघेर, बाजूशिवण इत्यादी ठिकाणी हातशिलाईसाठी किंवा घेर मारण्यासाठी याचा उपयोग होतो. दक्षता: (१) कापड़ कापताना कात्रीचाच उपयोग करा. (२) कापड़ मोजताना मीटर टेपचा वापर करा. (३) शिलाई काम करताना मुलांना थोडे लांब लांब बसवा. उपक्रम ः (१) शाळेतील पडदा फाटला असेल तर शिवून घ्या. (२) नवीन पडदे तयार करा. (३) बाजारासाठीच्या पिशव्या पातळ कापडाच्या शिवणे. शिक्षक कृती: (१) मुलांना शिवणकामाविषयी माहिती सांगा. (२) कात्री,कापड,दोरा, सूई या गोष्टी दाखवा.