पान:गृह आरोग्य.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३० सेंमी कृती: माहिती: सीड स्टिच : सीड (Seed) या इंग्लिश शब्दाचा अर्थ 'बी' असा आहे. या विणीला 'साबुदाण्याची वीण' ही म्हणतात. या टाक्यांसाठी विषम संख्येत टाके घेणे आवश्यक आहे - प्रत्येक सुईवरचा पहिला टाका सुलट व दुसरा उलट विणल्यामुळे व टाक्यांची संख्या विषम असल्यामुळे प्रत्येक टाका एका बाजूने सुलट व दुसऱ्या बाजूने उलट विणला जातो. त्यामुळे छोट्या गाठीसारखा किंवा बीसारखा किंवा साबुदाण्यासारखा दिसतो. दहा नंबरची सुयांची जोडी व ३ किंवा ४ प्लायची लोकर वापरल्यास - ५ सेंमी = १५ टाके, १० सेंमी = ३० टाके, २५ सेंमी =७५ टाके , ३० सेंमी = ९० टाके. (ड) विणकाम - रिबिंग स्टिच उद्देश : रिबिंग स्टिच वापरून लोकरी शाल विणणे. आकृती अपेक्षित कौशल्ये : विद्यार्थ्याला विशिष्ट क्रमाने काही टाके सुलट व काही टाके उलट विणता येतात. साहित्य : विणकामाच्या १० नंबरच्या सुयांची जोडी, ३ किंवा ४ प्लायची लोकर १०० ग्रॅम ६० सेंमी (१) दहा नंबरच्या एका सुईवर ९० टाके हाताने किंवा दुसऱ्या सुईने विणून घ्या. साधारणपणे ३ किंवा ४ प्लायची लोकर वापरून ९० टाके घातल्यास ३० सेंमी रुंद विणकाम तयार होते. (२) छोटा रिबिंग स्टिच : सुईवरील पहिला टाका सुलट व दुसरा टाका उलट विणा. याचप्रमाणे पुढचे सर्व टाके एक आड एक सुलट व उलट विणा. एकूण टाके सम संख्येत असल्याने शेवटचा टाका उलट विणला जाईल. सुई बदलल्यानंतर पहिला टाका सुलट व दुसरा टाका उलट याच क्रमाने सर्व टाके विणा. विणकामाची लांबी ६० सेंमी. होईपर्यंत विणकाम करा. मोठा रिबिंग स्टिच : सुईवरील पहिले ३ टाके सुलट व पुढचे ३ टाके उलट विणा. याचप्रकारे पुढचे ३ टाके सुलट व त्यानंतरचे ३ टाके उलट विणा. एकूण टाके सम संख्येत असल्याने शेवटचे टाके उलट विणले जातील. सुई बदलल्यानंतर सुद्धा पहिले ३ टाके सुलट व पुढचे ३ टाके उलट याच क्रमाने सर्व टाके विणा. विणकामाची लांबी ६० सेंमी. होईपर्यंत विणकाम करा. दक्षता व काळजी : मोठ्या रिबिंग स्टिचसाठी सुईवरील एकूण टाके ३ ने भाग जाणाऱ्या सम संख्येत असणे आवश्यक आहे. शिक्षक कृती: (१) विणकामाच्या सुयांचे नंबर व त्यांची जाडी यांचा संबंध समजवावा. (२) अभ्यासक्रमातील ४ प्रकारचे टाके विविध ठिकाणी कसे वापरावेत, टाक्यांच्या इंग्रजी नावांच्या अर्थानुसार त्याचे विविध ठिकाणी उपयोजन सुचवले आहे. परंतु शिक्षकांनी आपली कल्पनाशक्ती वापरून या सर्व तपशिलात योग्य ते बदल करणे अपेक्षित आहे. (३) गार्टर : मोजेबंद/मोज्याची घट्ट बसणारी पट्टी.. (४) स्टॉकिनेट - अंगाला घट्ट बसणारे वस्त्र /मोजे, मोज्याचा मुख्य भाग. (५) सीड - बी किंवा बियांसारखी दिसणारी वीण. (६) रिबिंग – कडा /विणकामाची बॉर्डर. ५८