________________
(४) तारा कृती: (१) सोलर कुकरच्या मदतीने शेंगदाणे खरपूस भाजून घ्या. गार झाल्यानंतर ते सोलून, पाखडून त्याची साले काढून टाका. (२) मिक्सर किंवा खलबत्त्याच्या मदतीने शेंगदाणे जरा जाडसर कुटून घ्या. (३) जाड बुडाच्या स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात पाऊण किलो गुळ व २ वाट्या पाणी घाला, स्टोव्ह/गॅसच्या शेगडीवर मंद आचेवर पातेले ठेऊन गुळाचा गोळीबंद पाक तयार करून घ्या. तूप वितळवून एका थाळीमध्ये पसरून लावून तयार ठेवा. (५) गुळाच्या गोळीबंद पाकामध्ये शेंगदाण्याचे जाडसर कूट टाकून उलथण्याने ढवळा व ते गरम असतानाच तूप लावलेल्या थाळीमध्ये मिश्रण उलथण्याने पसरा. (६) मिश्रणाचा गर थोडा गार झाल्यावर सुरीने त्यात उभे व आडवे छेद घेऊन वड्या तयार करा. (७) मिश्रण पूर्ण गार झाल्यानंतर थाळीतून वड्या सुट्या करून काढा. (८) १०० ग्रॅमच्या वड्या वजन करून घ्या व प्लॅस्टिक किंवा बटर पेपरच्या योग्य आकाराच्या तुकड्यावर या वड्या आकर्षकपणे रचा व प्लॅस्टिकच्या आकर्षक पाकीटात सीलबंद करा. पाकीटावर किंमत, वजन, उत्पादन दिनांक इ. माहितीचे लेबल लावा. शिक्षक कृती : या प्रात्यक्षिकामध्ये शेंगदाणे भाजण्यासाठी सोलर कुकर वापरणे अपेक्षित आहे. त्या निमित्ताने विद्यार्थ्यांना पारंपरिक व अपारंपरिक ऊर्जा स्रोत, पारंपारिक ऊर्जा स्रोतांची मर्यादा व त्यांच्या वापरामुळे होणारे प्रदूषण, अपारंपरिक ऊर्जा स्रोतांच्या वापराची आवश्यकता इ. मुद्दे सांगावेत. माहिती : चिक्की हाताला चिकटणारी नसावी. खाण्यास कुरकुरीत असावी. * पाकाचे प्रकार : गूळ व पाणी तापवल्यानंतर काही वेळाने ते मिश्रण पारदर्शक दिसू लागेल. पाकाचा एक थेंब अंगठा व तर्जनीच्या चिमटीमध्ये घेऊन चिमूट उघडावी. पाकाची एक तार तयार झाली तर एकतारी पाक तयार झाला असे समजावे. थोड्या वेळाने पाकातील पाणी आटल्यामुळे पाक दाट होतो व चिमटीमध्ये पाकाच्या दोन तारा तयार होतात. हा झाला दोन तारी पाक. अशाच प्रकारे पाक जसजसा दाट होत जातो तसतसा तीन तारी पाक तयार होतो. पाकाचा थेंब पाण्यात टाकल्यावर तो जागच्याजागी थिजून त्याची गोळी तयार झाल्यास गोळीबंद पाक तयार होतो. साधारणपणे मुरंब्यासाठी एकतारी पाक, जॅमसाठी दोनतारी पाक/तीनतारी पाक व चिक्कीसाठी गोळीबंद पाक वापरतात. किंमत काढणे : तयार चिक्कीची विक्री किंमत ठरविणे. उपक्रमः (१) चिक्की उद्योगास भेट द्या. (३) चिक्कीचे पॅकेजिंग व मार्केटींग करणे. (२) चिक्कीचे प्रेझेंटेशन तयार करा. (४) मकर संक्रांतीच्या आधी ५ किलो तीळवडी तयार करून विक्री करणे. संदर्भ : शिक्षक हस्तपुस्तिका, इ. ९ वी, पान नं.२४७, २४८ (प्रात्यक्षिक क्र.८) दिवस : दुसरा प्रात्यक्षिक : टोमॅटो सॉस तयार करणे, प्रस्तावना : भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. भारतात शेतकरी अनेक वेगवेगळ्या पिकांचे उत्पन्न घेतात. या पिकांत टोमॅटो हे पीक एकाच वेळी घेतले जाते. पण काहीवेळा अनेक शेतकरी हे पिक मोठ्या प्रमाणावर घेतात. पुढे हे पीक मोठ्या प्रमाणावर बाजारात उपलब्ध होते. परिणामी टोमॅटो पिकाची बाजारातील मागणी कमी होते व पिकाला मिळणारा बाजारभाव कमी मिळतो. अशावेळी तुम्ही टोमॅटो सॉस तयार केल्यास तुम्हाला या उत्पन्नातून