Jump to content

पान:गृह आरोग्य.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गृह आरोग्य इयत्ता : ८ वी दिवस : पहिला प्रात्यक्षिक : चिक्की तयार करणे, प्रस्तावना : भारतातील लोक आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगणारे असतात. त्याचप्रमाणे विविध सण साजरा करण्याकडे त्यांचा कल जास्त असतो. अनेक सणांमध्ये मकर संक्रांत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणाला तीळगूळ एकमेकांना देऊन हा सण साजरा करतात. तसेच या सणाला तीळवडीही देतात. अशावेळी तीळवडी तयार करून विक्री केल्यास आपणास मोठा फायदा होऊ शकतो. उदा. लोणावळा येथील चिक्की, तीळवडी भारतात प्रसिद्ध आहे. कोकण, गोवा येथे खोबऱ्यापासून चिक्क्या बनवितात. संपूर्ण भारतात सुकामेवा, विविध फळे, शेंगदाणे यांपासून चिक्क्या बनविल्या जातात. उद्देश : अन्नपदार्थ टिकविण्यासाठी परिसरात उपलब्ध असलेले उत्तम दर्जाचे शेंगदाणे, खोबरे, तीळ इत्यादीपासून चिक्की तयार करणे, विक्रीसाठी योग्य वजनात पॅकींग करणे व विक्री किंमत ठरवणे. साहित्य व उपकरणे : शेंगदाणे १ किलो, गूळ पाऊण किलो, तूप २० ग्रॅम/१ डाव, मिक्सर किंवा खलबत्ता, जाड बुडाचे स्टेनलेस स्टीलचे पातेले, चमचा, उलथणे, डाव, सोलर कुकर, थाळी, सुरी, प्लॅस्टिक/बटर पेपर, पक्कड. पूर्व तयारी : (१) चिक्की तयार करण्यासाठी सर्व साहित्य योग्य प्रमाणात उपलब्ध करणे. (२) चिक्कीची जाडी योग्य येण्यासाठी चिक्कीचा ट्रे असणे आवश्यक आहे. (३) चिक्कीचे योग्य प्रमाणात तुकडे करण्यासाठी कटर आवश्यक आहे. शिक्षक कृती: (१) विद्यार्थ्यांना चिक्कीसाठी लागणाऱ्या घटकांबद्दल माहिती द्या. (२) विद्यार्थ्यांना चिक्कीमधून मिळणाऱ्या घटकांबद्दल माहिती द्या. (३) ज्या ठिकाणी चिक्की तयार करणार असाल त्या ठिकाणी सर्व साहित्य काढून ठेवणे. शेंगदाणे व्यवस्थित भाजले आहेत का हे पाहणे. (५) कढईत साखरेचा पाक तयार करताना पाकांचे प्रकार मुलांना दाखवणे. शेंगदाण्याचा कूट व साखरेचा पाक एकत्र केलेला गोळा एक समान लाटणे आवश्यक आहे. (७) चिक्कीच्या वड्या पाडताना तयार केलेला चिक्कीचा गोळा गरम असताना तत्परतेने वड्या पाडाव्यात. (८) विद्यार्थ्यांना फ्लो चार्ट काढून दाखवणे व कसा काढला ते शिकविणे. (९) विद्यार्थ्यांना कॉस्टींग शिकविणे. (१०) चिक्कीचे पॅकींग करण्यास शिकविणे. अपेक्षित कौशल्ये : (१) गुळाच्या पाकाच्या कसोट्या वापरून चिक्कीस योग्य प्रकारचा पाक तयार झाल्याचे अनुमान विद्यार्थ्याला काढता येणे. (२) वापरलेल्या साहित्याच्या किंमतीवरून इतर खर्च ठरवून चिक्कीची विक्री किंमत ठरविता येणे. (३) चिक्कीच्या वड्या व्यवस्थित पाडता येणे. दक्षता : (१) शेंगदाण्याची साले चिक्कीमध्ये जाणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. (२) थाळीतील मिश्रणाच्या थराची जाडी सर्व ठिकाणी सारखी असावी. (३) चिक्कीच्या वड्या एकसमान आकाराच्या असाव्यात. (४) चिक्की गरम असताना पॅक करू नये. (५) चिक्कीचा गोळा गरम असताना ट्रेमध्ये लाटून लगेच वड्या पाडाव्यात. (६) शगदाण्याचा