पान:गृह आरोग्य.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उपक्रमः (१) विणकामातून तयार झालेल्या वस्तुंचे शाळेत प्रदर्शन लावावे व त्या वस्तुची विक्री करावी. संदर्भ : (१) शिक्षक हस्तपुस्तिका, इ.९वी, पान नं.२१० ते २१५. (२) क्रोशाकाम व विणकाम, शिक्षक हस्तपुस्तिका कार्यानुभव, इ. ९ वी, पान नं.१२ ते १९. माहिती: आकृती गार्टर स्टिच: AAL गार्टर (Garter) या इंग्लिश शब्दाचा अर्थ 'मोजेबंद' असा आहे. मोज्यांची मनगटावर किंवा पायावर घट्ट बसणारी पट्टी म्हणजे मोजेबंद. गार्टर स्टिचचा उपयोग प्रामुख्याने मोजेबंद विणण्यासाठी केला जातो. YOYAYala SWATANT/MAMAMAMANI स्टॉकिनेट स्टिच: (Stockinet) हा शब्द इंग्लिश स्टॉकिंग्ज (Stockings) या आकृती शब्दावरून तयार झाला आहे. स्टॉकिंग्ज म्हणजे अंगाला घट्ट बसणारे वस्त्र, लोकरीच्या इतर कपड्यांपेखा मोजे अंगाला घट्ट बसतात. स्टॉकिनेट स्टिच साधारणपणे मोज्यांचा मध्यभाग विणण्यासाठी वापरतात. (क) विणकाम - सीड स्टिच उद्देश : सीड स्टिच वापरून छोटा लोकरी रुमाल विणणे. आकृती अपेक्षित कौशल्य : विद्यार्थ्याला एकाच सुईवर एक टाका सुलट व दुसरा टाका उलट विणता येणे. साहित्य : विणकामाच्या १० नंबरच्या सुयांची जोडी, ३ किंवा ४ प्लायची लोकरी ५० ग्रॅम. कृती : (१) दहा नंबरच्या सुईवर ९१ टाके हाताने किंवा दुसऱ्या सुईने विणून घ्या, साधारणपणे ३ किंवा ४ प्लायची लोकर वापरून ९१ टाके घातल्यावर ३० सें.मी रुंद विणकाम तयार होते. (२) पहिला टाका सुलट व दुसरा टाका उलट विणा. याप्रमाणे सर्व ९१ टाके एक आड एक सुलट व उलट विणून घ्या. शेवटचा टाका सुलट विणला जाईल. (३) सुई बदलल्यानंतर पुन्हा पहिला टाका सुलट व दुसरा टाका उलट याप्रमाणे सर्व ९१ टाके विणून घ्या. शेवटचा टाका विणला गेला पाहिजे. (४) अशाप्रकारे ३० सेंमी. लांबीचे विणकाम पूर्ण करा, शालीची रुंदी व लांबी ३०-३० सेंमी असेल. दक्षता व काळजी : विणकामासाठी सुईवर विषम संख्येतच टाके घ्यावे. शिक्षक कृती: (१) शालीच्या चारही बाजूंनी किंवा समोरासमोरील दोन बाजूंनी लोकरीचे ४-४ दशा सोडाव्या. (२) एकूण टाक्यांची संख्या विषम असल्यामुळे प्रत्येक सुईवरचा शेवटचा टाका उलट विणला जातो, हा शेवटचा टाका सुई बदलल्यानंतर पहिला टाका येतो. सुई बदलल्यानंतरचा हा पहिला टाका सुलट विणायचा असतो. या पद्धतीमुळे प्रत्येक टाका एका बाजूने सुलट व दुसऱ्या बाजूने उलट विणला जातो. याला सुलट्यावर उलटे आणि उलट्यावर सुलटे म्हणतात. ५७