पान:गृह आरोग्य.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विणकाम : सुईवर टाके घालणे. साहित्य व साधने : १० नंबर सुया, लोकर. टाके घालण्याच्या दोन पद्धती आहेत. (अ) विणकाम सुरू करताना प्रथम सुईवर टाके घालावे लागतात.(ब) सुईने टाके विणून सुईवर घालणे. (१) कृती (अ): लोकरीची सरकफसाची गाठ करावी. ही गाठ डाव्या सुईवर घ्यावी. या सरकफासाच्या गाठीत पुढून सुई घालावी. यावर लोकरीचा वेढा घ्यावा. हा वेढा सुईने बाहेर टाक्यातून ओढून घ्यावा व डाव्या हातातील सुईवर टाका चढवावा. पुन्हा तयार झालेल्या टाक्यातून सुई घालून वरीलप्रमाणे करावे. आकृती: सरकफासाची गाठ (२) (३) (२) कृती (ब) : यामध्ये टाके घालण्याची पद्धत वरीलप्रमाणेच आहे. परंतु सुई दोन टाक्यांच्या मधून घालून नंतर लोकरीचा वेढा देऊन सुईतून बाहेर काढावा व टाका सुईवर चढवावा. अशा प्रकाराने घातलेल्या टाक्यामध्ये खालची ओळ जरा वेगळी दिसते. टाक्यांच्या खालच्या बाजूस साखळी तयार होते. आकृती: कृती : सुईवर २० टाके घालणे. टाके घातलेली सुई डाव्या धरावी. डाव्या हातातील सुईमधील टाक्यात हातातील सुई पुढील बाजूने घालावी. वेढा पुढून घेऊन विणून उजव्या सुईवर घ्यावा. डाव्या सुईवरचा टाका सोडावा. लोकर ओढून घ्यावी. हीच कृती पुन्हा पुन्हा करावी. उलट टाके असे घालावेत. सुलट टाके असे घालावेत. दक्षता : (१)विणकाम करताना दोन विद्यार्थ्यांमध्ये अंतर ठेवा. (२) वापरणाऱ्या सुया १० नंबरच्याच असाव्यात. (३) टाके टाकताना संपूर्ण एकाच सुईवर आल्यावरच घाला. मध्येच घालू नका. ५६