पान:गृह आरोग्य.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संदर्भ: शिक्षक हस्तपुस्तिका, इ.९ वी, पान क्र.२१६ ते २१८. विज्ञान आणि तंत्रज्ञान, इ.१०वी भाग), पान क्र.४९ ते ७८,११७ ते १३३,१३६ ते १४३ सामान्य विज्ञान, पुस्तक तिसरे, इ.५वी, पान क्र.१५ ते २२ दिवस : सातवा प्रात्यक्षिक : सीड व रिबीन स्टीचचे प्रत्येकी एक पॅटर्न बनविणे. प्रस्तावना : आजकाल विविध प्रकारच्या विणी असलेल्या पुस्तकात कल्पकतेने खूप भर पडत आहे. त्या विणीचा उपयोग स्वेटर्स, शाली इ. लोकरीचे कपडे बनविण्यासाठी होतो. दोऱ्याच्या साहाय्याने तोरणे, रुमाल, पिशव्या इ. अनेक शोभिवंत व नाजूक वस्तू बनविल्या जातात. टाक्यांसाठी असलेल्या खुणा व आराखड्यांबाबत कोणीही हे विणकाम करू शकते, त्याला भाषेचा अडसर येत नाही. विणकाम जरी मशीनवर करता येत असले तरी त्याला विणींच्या मर्यादा पडतात. तसेच हे विणकाम सैलसर करता येते व लोकरीचा पुनर्वापर करता येतो. परंतु तंत्रज्ञान वापरून मोठ्या प्रमाणावर स्वेटर सारख्या वस्तू कारखान्यात तयर होत आहेत. विणकामामुळे एकाग्रता, सौंदर्यदृष्टी व नीटनेटकेपणा या गुणांचे संवर्धन होते. पूर्वतयारी :(१) विणकाम करताना सुई ही १० नंबरची पाहिजे. (२) लोकर सलग असावी. (३) शिकत असताना लोकरीचा कलर सफेद (पांढरा) असू नये. (४) जास्त मुले असतील तर दोन गट करून एका गटाला सीड स्टिच व दुसऱ्या गटाला रीबीन स्टीच हे पॅक्टीकल द्या. (५) सर्व विद्यार्थ्यांना पुरेल एवढे मटेरिअल तुमच्यापाशी असले पाहिजे. उपक्रमाची निवड करणे : (१) मफलर तयार करणे. (२) स्कार्फ तयार करणे. अपेक्षित कौशल्ये : (१) दोन्ही हातात सुया पकडता येणे. (२) विण एकसारखी घालता येणे. विशेष माहिती: सुईवर टाके घालणे साहित्य व साधने : १० नंबर सुया, लोकर विणकामाची सुरुवात करताना प्रथम सुईवर टाके घालावे लागतात. सुईने टाके विणून सुईवर घालणे. या पद्धतीने टाके घालण्याच्या दोन पद्धती आहेत. शिक्षक कृती : रीड व रिबीन (१) विणकामाबद्दल माहिती विद्यार्थ्यांना सांगा. (२) लोकरीचे प्रकार सांगा (३) सुयांचे प्रकार सांगून ते कोणत्या ठिकाणी कोणत्या सुया वापरायच्या हे सांगा. (४) १० नंबरच्या सुया हातामध्ये कशा धरायच्या हे सांगा. लोकरीचा दोरा मुठीमधून कसा पकडायचा हे सांगा. विणकाम करताना सर्वात प्रथम गाठ कशी मारली जाते हे तुम्ही करून दाखवा. तुम्ही विद्यार्थ्यांना टाके कसे घालायचे हे सांगा. यानंतर दुसरी सुई घेऊन कसे विणकाम चालू करायचे हे तुम्ही दाखवा. विद्यार्थ्यांना विणकाम करताना मधून मधून पहिल्यांदा जेवढे टाके घातले तेवढे आहे की नाही हे पाहण्यासाठी टाके मोजण्यास सांगा. पॅटर्न झाल्यावर बंद करायच्या वेळी तुम्ही त्यांना दोन टाके कसे बंद करायचे हे करून दाखवा. (११) तयार केलेले पॅटर्न मुलांना त्यांच्या पॅक्टीकल वहीत चिटकवण्यास सांगा.