पान:गृह आरोग्य.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४ ४३ दाणे | ए 1-Thalimin दाणे व तेलबीया, सीसेम, मटार, सर्व बेरीबेरी, पायात गोळे येणे, मानसिक तणाव प्रकारच्या आख्ख्या डाळी,गहू,सोयाबीन | Edema,भूक न लागणे, वजनात घट व2-Niacin यीस्ट, मटार, वाटाणे, Peanut Butter | Acute-PellagraAnoria तोंडयेणे, सीसेम बीया, सोयाबीन आख्ख्या डाळी, अशक्तपणा,चीडचीड, मानसिक तणाव, दाणे, मासे, अंडी इ. Orgam meet. damage to contra Nervous System Skin प्रथिने : कोणते अन्न पदार्थ आपल्याला प्रथिने पुरवितात? __ प्रथिने पुरविणारे वेगवेगळे अन्नपदार्थ खालील तक्त्यात दाखविले आहेत. अन्नपदार्थ | प्रथिने क्षमता (१०० ग्रॅम प्रति पदार्थ) | अन्नपदार्थ | प्रथिने क्षमता(१०० ग्रॅम प्रतिपदार्थ) चीझ पनीर १५ दूध पावडर ३८ मांस, मासे १८-२० सोयाबीन डाळी १८-२४ १८-२५ | अखंड डाळी ८-१२ प्रथिनयुक्त अन्नाचे शारीरिक महत्त्व : प्रथिनयुक्त शारीरिक महत्त्व हे त्या प्रथिनांमध्ये असलेल्या अॅमीनो अॅसीड वरून ठरविता येते. दूध, मासे, मांस, सोयाबीन हे अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणून त्यांना अत्यंत चांगले प्रथिने म्हणतात. भाजीपाला ७५, प्राण्यांपासून २५, अखंड डाळीपासून ५० व फोडलेल्या डाळीपासून ५० प्रथिने मिळतात. अतिप्रथिने इजाकारक असतात. अति प्रथिने हानीकारक असतात. त्यामुळे (१) किडनी खराब होते. (२) हाडातील खनिजे कमी होतात. (३) आतड्याचा कर्करोज होऊ शकतो. (४) प्रथिने खनिजात रूपांतरीत होऊन हानी होऊ शकते. योग्य प्रमाणात न मिळणाऱ्या प्रथिनांचे परिणाम : योग्य प्रमाणात प्रथिने न मिळाल्यास शरीर वाढीवर परिणाम होतो. शारीरिक व मेंदूची वाढ कमी होते. आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे लहान मुलामध्ये Kwashiorkar नावाचा रोग होतो. PEM (Protin-Energy Malnutrition) रोग होता. प्रगतीशील देशामध्ये हा रोग आढळतो. अपेक्षित कौशल्य : कामानुसार आहार कसा घ्यावा व कोणते पदार्थ घ्यावेत, ते अभ्यासणे. विशेष माहिती : कॅलरी आणि खाद्यकॅलरी : कॅलरी हे उष्मा मोजण्याचे एकक आहे. एक ग्रॅम पाण्याचे तापमान 1°C ने वाढविण्यासाठी द्यावा लागणारा उष्मा म्हणजे १ कॅलरी उष्मा होय.१किलोग्रॅम पाण्याचे तापमान 1°C ने वाढविण्यासाठी द्यावा लागणारा उष्मा म्हणजे १ किलोकॅलरी उष्मा होय, पोषणद्रव्ये व खाद्यपदार्थ याबाबतीत कॅलरीचा केलेला उल्लेख नेहमी किलोकॅलरीच असतो. संतुलित आहार : उत्तम आरोग्य राखण्यासाठी आपल्याला प्रथिने, कार्बोदके, मेद, जीवनसत्त्वे, क्षार इत्यादीची जरुरी असते. सर्वच अन्नपदार्थामध्ये ही पोषणद्रव्ये थोड्या अधिक प्रमाणात असतातच, पण कोणत्याही एका अन्नपदार्थांमध्ये सर्व पोषणद्रव्ये योग्य प्रमाणात नसतात. ज्या आहारातून उत्तम आरोग्य राखण्यासाठी ऊर्जा समृद्ध पदार्थ (कार्बोदके, मेद) मिळतात, शरीराच्या जडणघडणीसाठी आवश्यक पदार्थ (प्रथिने, क्षार); जीवनसत्त्वे शरीराला योग्य प्रमाणात मिळतात तोच 'संतुलित आहार' होय. वय, लिंग, शारीरिक श्रम, व्यवसायाचे स्वरूप, गर्भारपण, स्तनदा अशा व्यक्तींच्या संतुलित आहाराच्या गरजेमध्ये फरक पडतो. वाढीच्या वयातील युवक, गर्भवती स्त्रिया, स्तनदा यांना संतुलित आहाराची गरज असते. तसेच क्रीडापटू, अधिक श्रमाचे काम करणारे लोक यांची अन्नाची व ऊर्जेची गरज ही शांत व संथ जीवनपद्धती असणाऱ्या लोकांच्या तुलनेने खूपच अधिक असते. ५२