पान:गृह आरोग्य.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४) रागप्रतिक्षा रोग प्रतिबंधक शक्तिची निर्मिती व संवर्धन करणे. (५) विद्युत चुंबकीय लहरींची निर्मिती व (PH) चे रक्षण करणे. (६) उत्सर्जन क्रिया सुलभ करणे. (७) आपल्या जीवनाचे उद्दिष्ट परिपूर्ण करण्यास मदत करणे. इतक्या महत्त्वाच्या गोष्टींशी आहाराचा, पर्यायाने आरोग्याचा आणि अस्तित्वाचा किंवा जीवनाचा निकटचा संबंध आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका. आहाराचे स्वरूप आणि प्रकार : हवा आणि पाणी यांना रोम आहार असे म्हणतात आणि घन स्वरूपात घेतल्या जाणाऱ्या आहाराला कवल आहार असे म्हणतात. अ) हवा, पाणी आणि सूर्यप्रकाश हे देखील अन्नच, पण याची जाणीव फार थोड्यांना आहे. खरे तर हवेला सर्व अन्नामध्ये अधिक महत्त्व आहे. खायला नसेल तर उपाशी पोटी का होईना,पण काही काळ (महिने) मनुष्य जगू शकतो. पाण्याशिवाय काही दिवस राहू शकतो. पण हवेशिवाय काही मिनिटे देखील जिवंत राहू शकत नाही. म्हणून हवेला परम अन्न असे संबोधले जाते. आपल्या शरीराचा ६३% भाग हा पाण्याने बनला आहे. शरीरातील विविध पेशींना जे अन्न पोचवले जाते ते रक्तामधून व रक्ताची द्रवता ही पाण्यामुळे टिकून राहते. कवल आहार - आपण दैनंदिन जीवनात भात, भाजी, फळे या स्वरूपात जो आहार घेतो तो आहार म्हणजे कवल आहार होय. या कवल आहाराची निर्मिती ही दोन प्रकारात असते. (१) शाक /वनस्पतीजन्य आहार (फळे, धान्य इ.) (२) मांस /पशुजन्य आहार (अंडी, मांस, मासे इ.) पचनक्रिया : पचनक्रियेस आपण कशी मदत करू शकतो? पचनक्रिया ही रासायनिक क्रिया आहे. आपण खातो त्या अन्नाचा संबंध पाचक रसाशी येतो. आपण घेतो त्यातील दोन तृतीयांश पेक्षा जास्त अन्नाचा भाग हा घन स्वरूपात असतो. त्याचे भरपूर चर्वण झाले पाहिजे. माणसांच्या दातांची रचना निसर्गाने त्या दृष्टीनेच केली आहे. दात हे फक्त तोंडात आहेत. जठरात नाहीत याची जाणीव असावी. चर्वण करीत असताना लाळ निर्माण होते व आपण खातो ते अन्न त्या लाळेत विरघळल्याने ते जीभ व टाळूच्या भागात असलेल्या चव ग्रंथी आपण कोणत्या प्रकारचे अन्न घेत आहोत (उदा. शर्करा, प्रथिने, स्निग्ध वगैरे) याची संवेदना मेंदूकडे पाहोचवते. मेंदूकडून संबंधीत ग्रंथींना (यकृत, पित्ताशय, स्वादूपिंड वगैरे) वरील अन्न पचवण्यास आवश्यक असणारे पाचकरस निर्माण करण्याची जणू आज्ञाच मिळते. त्यामुळे गिळलेले अन्न जठर, लहान आतडे या भागात जेव्हा जाते त्यावेळी तेथे अगोदरच पाचकरस त्याचे स्वागत करण्यास तयार असतो. म्हणूनच आहार अत्यंत सावकाश व भरपूर चर्वण करून खाल्ला पाहिजे. प्रत्येक घास बत्तीस वेळा चावून खावा, असे म्हणतात त्यामागे हाच उद्देश आहे. घास भरपूर चावून खाल्ल्यास घन अन्नाची पूड होते. त्यामुळे पृष्ठभाग वाढतो व पाचक रसाशी अधिक संबंध येतो. यासाठी महात्मा गांधी म्हणतात, 'घन पदार्थ पिता येईल इतके त्याचे चर्वण करा व पातळ पदार्थाची चव समजेपर्यंत ते तोंडात असू द्या!' हाच त्याचा मतितार्थ! पिष्टमय पदार्थ (कार्बोहायड्रेटस्) : पिष्टमय पदार्थ मानवी शरीरातील ऐच्छिक व अनैच्छिक कार्य आणि शरीरातील प्रोटीन व जड पदार्थाच्या निवळीकरणाला मदत करतात. साखर, पाणी, मुळा, कारले इ. पदार्थांत आपल्याला पिष्ठमय पदार्थ आढळतात. साखर ही १००% पिष्टमय आहे. भाजीपाला, फळे आणि डाळींचे कवच (टरफल) हे पदार्थ जास्तीत जास्त पिष्टमय पदार्थ (साठवून असतात) व हे पदार्थ मानवी आतड्यांमध्ये पचवू शकत नाहीत. म्हणून या पदार्थाला किंमत देत नाही व टाकावू म्हणून प्रसिद्ध आहेत व शारीरिक तंदुरुस्तीसाठी व ५०