पान:गृह आरोग्य.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व्यक्तीच्या आहारात आवश्यक असणारी पोषणद्रव्ये नसतील किंवा पुरेशा प्रमाणात नसतील तर ती व्यक्ती रोगास बळी पडते. संतुलित आहाराचे अंदाजे पोषण मूल्य पुढीलप्रमाणे : कॅलरी ८०००, प्रथिने ९०० ग्रॅम, कार्बोदके ४५० ग्रॅम, स्निग्ध पदार्थ ९०० ग्रॅम, कॅल्शियम १.४ ग्रॅम, फॉस्फरस २० ग्रॅम, लोह ४७ मि. ग्रॅम, कॅरोटिन आणि अ जीवनसत्व ४०० , थायमिन २.१ मि.ग्रॅम, रायबोफ्लोविन १.८ मि.ग्रॅम , निकोटिनिक आम्ल २.२ मि.गॅम, क जीवनसत्व २४० मि.ग्रॅम. या प्रात्यक्षिकात (9) ऊर्जासंपन्न स्त्रोत (२) संतृप्त स्निग्ध पदार्थ, फ्लुरिन आणि जीवनसत्वे यांचे अतिसेवन केल्याने कोणते रोग होतात व त्यामुळे शारीरिक समतोल कसा बिघडू शकतो हे शिकणार आहोत. पूर्व तयारी : वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, कडधान्ये, धान्ये आणून ठेवा. उपक्रमांची निवड करणे: (१) शाळेतील पोषण आहारातून मुलांना किती कॅलरीज प्रोटीन मिळतात ते काढा. (२) शाळेच्या बाहेर मिळणारे पदार्थामधील कॅलरीज प्रोटीनचे प्रमाण काढा. (३) मुले घरी घेत असलेल्या आहारातून मुलांना मिळत असणाऱ्या कॅलरीजचे प्रमाण काढा. शिक्षक कृती:(१) कॅलरीज व प्रोटीनबद्दल विद्यार्थ्यांना माहिती द्या, (२) आहार म्हणजे काय हे सांगा. (३) धान्ये, कडधान्ये विद्यार्थ्यांना दाखवा. (४) तुम्ही मुलांना एक उदाहरण सोडून दाखवा, विद्यार्थ्यांना एक उदाहरण द्या व सोडवून घ्या, (५) मुलांना ते रोज कोणता आहार घेतात त्यानुसार त्यांच्या शरीरात किती कॅलरीज जातात हे काढायला सांगा. (६) कोणत्या पोषणद्रव्यामुळे मानवी शरीराला कोणता फायदा होतो व ती कशातून मिळतात हे सांगा व विद्यार्थ्यांना लिहून द्या. (७) शरीरयष्टीवरून व्यक्तीला किती कॅलरीज लागतील, हे सांगा. आहार म्हणजे काय? स्थूलमानाने आहाराची व्याख्या करावयाची झाली तर जगण्यासाठी, शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी तोंडाद्वारे खाल्ले जाणारे खाद्य म्हणजे 'आहार' होय. आहाराची आवश्यकता : मानवाला काम करण्यासाठी ऊर्जा लागते. ही ऊर्जा किंवा कॅलरीज अन्नातून मिळते म्हणून अन्नाची किंवा आहाराची आवश्यकता असते. माणसाला वेगवेगळी धान्ये, कडधान्ये, भाज्या, दूध इत्यादी पदार्थापासून ऊर्जा मिळत असते. किंबहुना आहारात जेवढे वैविध्य असेल तेवढा समतोल अधिक आणि अर्थातच तुमची आरोग्याची गाडी सदैव रूळावरच असेल! अखेर जीवन म्हणजे तरी काय हो? शरीरेंद्रिय - सत्वात्मसंयोगः आयु उच्चते । - शरीर, इंद्रिय, मन आणि आत्मा यांच्या संयुक्तीकरणाने जीवन बनते. शरीरधारा व चित्तधारा यांच्या मिलाफाने जीवनधारा यशस्वी होत असते. आहाराचे महत्व : आहार हा केवळ पोटाची खळगी भरून ढेकर देण्यासाठी नाही तर पुढील गोष्टीसाठी आहाराची आवश्यकता आहे - (१) दैनंदिन ऊर्जा निर्माण करणे. (२) शरीराची वाढ करणे. (३) नवीन पेशींची निर्मिती करणे.