पान:गृह आरोग्य.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दिवस: पाचवा प्रात्यक्षिक : नानकटाई तयार करणे. उद्देश : मैदा, तुप, साखरेचा वापर करून नानकटाई तयार करणे. साहित्य : (१) मैदा: ५०० ग्रॅम (२) पिठी साखर :२५० ग्रॅम (३) तूप : २५० ग्रॅम (४) बेकिंग सोडा-बेकिंग पावडर (५) अर्धा चमचा वेलची पूड (६) अर्धा चमचा जायफळ पूड (७) कापलेले बदाम आणि पिस्ते साधने : ताट, चमचा, ट्रे, सांडशी, ओव्हन, परात, पोळपाट, उलथन, नानकटाई साचा. कृती : (१) प्रथम तूप २५० ग्रॅम परातीत घेऊन फेटून घ्या व त्यात पीठी साखर २५० ग्रॅम हळुहळू टाकत फेटत रहा. (२) साखर व तुपाच्या मिश्रणात मैदा (५०० ग्रॅम), जायफळ, वेलची बारीक पूड, बेकिंग सोडा, अर्धा चमचा आणि बेकिंग पावडर अर्धा चमचा घेऊन एकत्र मळा. त्याचा गोळा तयार करा. गोळा पाटावर ठेऊन लाटून घ्या व साच्याच्या सहाय्याने विविध आकारात नानकटाई तयार करा. किंवा लहान गोळे करून चपटे करा. त्यावर बदामाचे काप किंवा पिस्ते लावा. नानकटाई ओव्हनच्या एका भांड्यात थोड्या थोड्या अंतरावर ठेवा. (५) ओव्हनमध्ये ही नानकटाई १६५ अंश सेल्सिअस तापमानाला १८ ते २० मिनिटे भाजा. (६) प्लास्टिक पिशवीत तयार नानकटाई भरा व पिशवी बंद करा. विशेष माहिती : नानकटाईमधील साहित्याचे प्रमाण २:१:१ हे असावे. म्हणजे मैदा: तूपः साखर हे २:१:१. उपक्रम : (१) विद्यालयात नानकटाई तयार करून विक्री करा. (२) नानकटाईमध्ये डाळीचे पीठ किंवा कणिक वापरून नानकटाई बनवा. दिवस: सहावा प्रात्यक्षिकः धान्य, कडधान्य व डाळी यातील कॅलरीज व प्रोटीन यांच्या | प्रमाणानुसार आहाराचा हिशोब करणे. प्रस्तावना : सर्वच सजीवांना त्यांच्या वाढीसाठी आणि शरीर जोपासनेसाठी अन्नाची आवश्यकता असते. शरीराच्या जडणघडणीसाठी आवश्यक ती सर्वच मूलद्रव्ये अन्नातून मिळतात. शरीराच्या सर्व क्रियांसाठी लागणारी ऊर्जा ही आपल्याला अन्नातूनच मिळते. त्यामुळेच अन्न ही शरीराची मूलभूत गरज असते. आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि उत्तम आरोग्य राखण्यासाठी अन्नाची जरुरी असते. अन्नाशिवाय आपले शरीर उबदार राहणार नाही. तसेच शरीरपेशी आणि ऊतींची वाढ होणार नाही. अन्नाशिवाय शरीरास कोणत्याही क्रिया करणे अशक्य होईल. ही सर्व महत्त्वाची कार्ये करण्यासाठी आवश्यक अशी रासायनिक पोषणद्रव्ये आपल्या अन्नामध्ये असतात. पोषणद्रव्यांचे योग्य प्रमाणात सेवन करून मानवी आरोग्य सुस्थितीत ठेवता येते. ज्या आहारात आवश्यक असलेल्या सर्व पोषणद्रव्यांचा योग्य प्रमाणात समावेश असतो त्यास 'संतुलित आहार' असे म्हणतात. जर ४८