पान:गृह आरोग्य.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दिवस : चौथा प्रात्यक्षिक : मुरंबा तयार करणे. प्रस्तावना : पूर्वी मनुष्य हा जंगलामध्ये वास्तव्य करत असे. त्यावेळी तो विविध प्रकारे फळे खाऊन वगैरे आपला उदरनिर्वाह करत असे. कालांतराने त्याने अग्नीचा शोध लावला. तेव्हापासून मानव अन्नपदार्थ शिजवून व भाजून खाऊ लागला. अगदी अलीकडच्या काळामध्ये भाजले अथवा शिजवलेले पदार्थ जास्त दिवस टिकवण्याची कला ही विकसित झाली. काही पदार्थ वाळवून नंतर खात असे. पण त्याची चव काही प्रमाणात बदलल्यामुळे चविष्ट लागत नसे. म्हणूनच लोणचे तसेच मुरंबा यासारख्या पदार्थाला फारच महत्त्व प्राप्त होऊ लागले. आता तर जेवणात या गोष्टी नसतील तर जेवण ही क्रियाच अपूर्ण वाटते. अर्थातच या सर्व गोष्टीचा आरोग्याला फायदा सुद्धा होऊ लागला. उदा. जेवणात मुरंब्यासारखा पदार्थ सेवन केल्यास तोंडामध्ये लाळ येणे हा प्रकार जास्त होतो व आरोग्याच्या दृष्टीने ते अतिशय फायद्याचे आहे. पर्यायानेच यासारख्या पदार्थांची मोठ्या प्रमाणावर उत्पन्नाची गरज भासू लागली आहे. म्हणून या प्रकरणामध्ये मुरंबा करण्यास शिकणार आहोत. पूर्व तयारी : मुरंब्यासाठी लागणारे साहित्य व मटेरिअलची तयारी करावी. साहित्य : कढई, परात, कलथा, किसणी, चिलके, चाकू इ. मटेरिअल : आवळा, साखर, इलायची इ. उपक्रमाची निवड : (१) आवळा मुरंबा तयार करणे. (२) गाजर मुरंबा तयार करणे. (३) कैरी मुरंबा तयार करणे, अपेक्षित कौशल्ये: (१) मुरंबा कोणकोणत्या पदार्थापासून बनविता येतो हे माहिती असणे. साखरेचे प्रमाण ठरविता येणे. (३) मुरंबा बनविण्याची कृती माहिती असणे आवश्यक. (४) मुरंबा झाल्याची चाचणी घेता येणे. विशेष माहिती : (१) कैरी कच्च्या स्वरूपातील असावी. आवळा पक्व असावा. (२) चालपट होऊ नये. साहित्य : आवळे, पाणी, तुरटी (चुन्याची निवळी), साखर इ. साधने : पसरट पातेले, कुकर, चाळणी (स्टीलची), सुई (मोठी), चमचा, कढई, चाकू, वजनकाटा, घड्याळ (वेळ पाहण्यासाठी), प्लॅस्टिक पिशवी (पॅकिंगसाठी), बरणी, सुती कापड, स्टोव्ह इ. कृती : सर्व प्रथम आवळे स्वच्छ पाण्याने धुवून घेणे. आवळ्याला सुईच्या साहाय्याने ८० ते १०० छिद्र करणे. यानंतर आवळ्याच्या वजनाइतकीच साखर घेऊन ती अर्धा ग्लास पाण्यात स्टोव्हवर उकळवणे. उदा. ५०० ग्रॅम आवळा असले तर ५०० ग्रॅम साखर घेणे. ती साखर पूर्णपणे वितळल्यावर त्यात छिद्र केलेली आवळे एकत्र करणे. काहीच मिनिटात आवळ्यांना चॉकलेटी रंग येऊ लागतो. मग ते मिश्रण स्टोव्हवरून उतरवणे. याप्रकारे मुरंबा तयार होतो. ते मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर त्याचे वजन ८०० ग्रॅम भरेल. ते मिश्रण एका स्वच्छ बरणीत ठेवावे. दक्षता : आवळे चांगल्या प्रतीचे असावे. सूचना : हंगामानुसार उपलब्ध फळांपासून मुरंब्याचे प्रात्यक्षिक घ्यावे. (२) ४७