Jump to content

पान:गृह आरोग्य.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोड रसाळ फळे शिजविणे : फळांच्या तुकड्यात ते बुडतील इतपतच पाणी घालून व निम्मे सायट्रिक आम्ल घालून ते पूर्ण मऊ होईपर्यंत शिजवावे. मधूनमधून लाकडी चमच्याने दाबून शिजवावे. वरील मिश्रण मिक्सरमधून काढून गाळून गर तयार करावा. (३) जॅम शिजविणे: फळांच्या गरात खालील तक्त्यानुसार साखर व उरलेले सायट्रिक आम्ल घालावे. जॅमसाठी साखरेचे प्रमाण : गराची चव साखरेचे प्रमाण गराच्या तीन चतुर्थाश आंबट गराच्या समप्रमाणात गराच्या निम्मे • वरील मिश्रण जाड बुडाच्या भांड्यात लाकडी चमच्याने हलवत मंद आचेवर शिजवावे. . पातेल्याच्या कडेपासून मिश्रण सुटू लागले की, जॅम झाला असे समजावे. (४) रंग, स्वादार्क व अन्नसंरक्षक मिसळणे : जॅममधील फळाच्या प्रकारानुसार त्यात रंग व स्वादार्क मिसळावा. थोडासा जॅम गार करून वाटीत घ्यावा, त्यात अन्नसंरक्षक घालावे व नीट ढवळून ते तयार जॅममध्ये मिसळावे. (अन्नसंरक्षक - सोडियम बेंझोएट १ किलो जॅमसाठी ०.५ ग्रॅम म्हणजेच पाव चहाचा चमचा) (५)जॅम भरणे : गरम जम निर्जतूक बाटलीत भरावा, यासाठी रुंद तोंडाची बाटली वापरावी. बाटलीच झाकण अर्धवट उघडे ठेवावे. पूर्ण गार झाल्यावर झाकण लावावे. (६)बाटली मोहोरबंद करावी. (७)बाटलीवर लेबल लावावे : यात पदार्थाचे नाव-घटक पदार्थ - तयार करण्याची तारीख, वजन, किंमत, पदार्थ साठविण्याविषयी सूचना यांचा समावेश असावा. (ब) जेली : फळातील पेक्टिनच्या अर्कात योग्य प्रमाणात साखर व आम्ल घालून ते पारदर्शक होईपर्यंत शिजवून गार करून जेली तयार करतात. आदर्श जेली पारदर्शक परंतु मऊ असते. ती सहज कापता येते व तिला ज्या फळापासून केली आहे त्याचा स्वाद व रंग असतो. ही जेली साच्यातून काढली तरी साच्याच्याच आकारात राहते.ती मोडत नाही. जेलीसाठी आवश्यक घटक : १. पेक्टिन : साधारणपणे चांगल्या जेलीसाठी ०.५ ते १% पेक्टिन आवश्यक आहे. २. आम्ल : आम्लामुळे जेली कडक न होता, आहे त्या आकारात, पण मऊ राहते. १ किलो फळांचा गर असल्यास १.५ ते २ ग्रॅम सायट्रिक आम्ल घालतात. ३. साखर : पेक्टिनच्या प्रमाणानुसार साखर घालतात. त्यामुळे गोड चव येते. तत्त्व : (१) साखरेचा अन्नसंरक्षक म्हणून वापर (२) उच्च तापमानाचा वापर. जेली करण्याची पद्धती (१) फळांची निवड : ताजी, निरोगी, घट्ट, पेक्टिनयुक्त उत्तम रंग व स्वाद असलेली फळे निवडावी. (२) पेक्टिन अर्क तयार करणे : • फळे धुणे : फळावरील माती, जंतुनाशके काढण्यासाठी फळे स्वच्छ धुवावी. -निर्जंतुकीकरण: साधने व उपकरणे उकळत्या पाण्याने निर्जंतुक करावी. फळांचे तुकडे करणे व पेक्टिन अर्क तयार करणे : फळांचे मध्यम आकाराचे एकसारखे तुकडे करावे. ୫୫