पान:गृह आरोग्य.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकूण पेरू ४ नग एकूण (५) जेली ठेवायच्या बरणीत पाण्याचा अंश अजिबात नको. (६) पाण्याचा हातही लावू नये. (७) जेलीचे वजन काढा. त्या आधी बरणीचे वजन काढा. खर्च : अ.क्र. मटेरिअल नग/Kg. दर २ किलो ४/कि.ग्रॅ. ८.०० लिंबू १.२५ साखर १७५ ग्रॅम १.६१ लवंग ५ नग ०.५० दालचिनी केरोसीन १लीटर २.५०/लीटर २.५० एकूण १३.६६ लेबर चार्ज ३.०० |१९.६६ विशेष माहिती (अ) जॅम : फळांचा गर पुरेशा प्रमाणात साखर व आम्ल घालून, योग्य तो घट्टपणा व एकसंघपणा येईपर्यंत शिजवून केलेल्या पदार्थाला जॅम म्हणतात. जॅमसाठी आवश्यक घटक : उत्तम जॅमसाठी योग्य प्रमाणात पेक्टिन, साखर व आम्ल आवश्यक आहे. १) पेक्टिन : फळामधील दोन पेशींना जोडणारा घटक म्हणजे पेक्टिन, पेरू, कवठ, काही जातीची सफरचंद यांसारख्या फळांत पेक्टिन भरपूर प्रमाणात असते. पेक्टिनची पावडर देखील बाजारात उपलब्ध आहे. २) साखर : साखरेमुळे जॅम टिकण्यास मदत होते. साखर जलशोषक असल्यामुळे फळांमधील पाणी बांधून ठेवते व सूक्ष्मजंतुना वाढीसाठी पाणी उपलब्ध होत नाही. अशात-हेने जममध्ये साखर 'अन्नसंरक्षक' म्हणून कार्य करते. ३) आम्ल : आम्लामुळे पदार्थाला चव येते. आम्लाचा थोड्या प्रमाणात अन्नसंरक्षक म्हणूनही वापर करतात. याशिवाय आम्लामुळे साखरेचे स्फटिकीकरण टाळले जाते व जॅम कडकडीत न होता, घट्ट पण मऊ राहतो. १किलो फळाच्या गरासाठी साधारणपणे ५ ग्रॅम सायट्रिक आम्ल घालावे. ४) पाणी: फळातील पेक्टिन काढून त्याचा गर करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. ५) रंग, स्वाद व अन्नसंरक्षक : योग्य रंग व स्वाद यामुळे जॅम आकर्षक व चविष्ट होतो. अन्नसंरक्षकामुळे जॅमचा टिकवणकाळ वाढतो. तत्त्व : (१) साखर व अन्नसंरक्षकाचा वापर (२) उच्च तापमानाचा वापर जॅम तयार करण्याची पद्धती: (१)फळांची निवड : जॅमसाठी ताजी, तजेलदार, रसरशीत आकर्षक रंगाची, निरोगी, पूर्ण पिकलेली फळे निवडावी. (२)फळांचा गर तयार करणे : फळे धुणे- फळांच्या पृष्ठभागावरील धूळ, घाण व कीटकनाशके संपूर्णपणे काढून टाकण्यासाठी फळे वाहत्या पाण्याखाली व्यवस्थित धुवावी. निर्जंतुकीकरण : साधने व उपकरणे उकळत्या पाण्याने निर्जंतुक करावी. फळांचे तुकडे करणे : फळांचे एकसारख्या आकाराचे मध्यम तुकडे करावे. त्यातील बिया, दोरे, देठ, रेषा हे भाग काढून टाकावीत.