________________
फोडणी पूर्ण गार झाल्यावरच वापरावी. बरण्या स्वच्छ धुवून कोरड्या असाव्यात. शक्यतो उन्हात ठेवून वाळवाव्यात. आतून गरम करून थंड केलेले मोहरीचे तेल लावून घ्यावे. • बुरशी आलीच तर तेवढा भाग काढून टाकावा. आणखी फोडणी करून गार करून घालावी. तत्पूर्वी आंबूस वास येत नाही ना याची खात्री करावी. आवडत असेल/हरकत नसेल तर व्हीनेगर अवश्य वापरावे. • ताजी लोणची करून खाणे कधीही उत्तम. त्यात जास्त मीठ आपण घालत नाही व मीठ कमी खाणेच हितकर. दक्षता: (१) लोणचे तयार करताना त्यात योग्य प्रमाणात मीठ वापरावे. (२) जास्त प्रमाणात मिठाचे सेवन केल्यास मीठ आरोग्यास हानीकारक असते म्हणून मीठ लोण्यच्यात योग्य प्रमाणात वापरावे. (1) उद्देश : मिश्र भाज्या लोणचे तयार करणे : परिसरात उपलब्ध करवंद, आंबा, कैरी, मिश्र भाज्या, मिरची इ. फळे वा फळभाज्यांपासून लोणची तयार करणे, विक्रीसाठी त्याचे योग्य मापात पॅकींग करणे व विक्री किंमत ठरविणे. अपेक्षित कौशल्ये: (१) उपकरणे निर्जंतुक करता येणे. (२) फोडणी देता येणे. साहित्य व उपकरणे : गाजर - १०० ग्रॅम, फ्लॉवर - १०० ग्रॅम, सोललेला मटार - १०० ग्रॅम, हिरवी मिरची१० ग्रॅम, किसलेली ओली हळद-पाव छोटा चमचा, लिंबू रस-४ छोटे चमचे, लाल तिखट-१ छोटा चमचा, मोहरी पूड-२ छोटे चमचे, तेल-४ छोटे चमचे, मेथीपूड-पाव छोटा चमचा, भाज्या चिरण्याचा बोर्ड व सुरी किंवा विळी, स्टेनलेस स्टीलचे पातेले व मोठा चमचा, काचेची बरणी, छोटी कढई, पक्कड किंवा सांडशी. कृती: (१) फ्लॉवर, गाजर व मिरची धुवून, वाळवून चिरा, (२) मेथीपूड सोडून इतर सर्व मसाले स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात चमच्याने एकत्र करा. (३) पातेल्यातील मसाल्याच्या मिश्रणामध्ये चिरलेल्या भाज्या, सोललेला मटार, किसलेली हळद एकत्र करावी व ते मिश्रण निर्जंतुक बरणीत भरावे, (४) छोट्या कढईत तेल गरम करून त्यात मेथीपूड घालावी व गार झाल्यावर ते बरणीतील मिश्रणावर ओतावे, चमच्याने नीट एकत्र करावे. (५) लिंबू रस घालून मिश्रण एकत्र करावे व झाकण घट्ट लावावे. (६) बरणी थंड व कोरडया जागी ठेऊन २ ते ३ दिवस लोणचे मुरू द्यावे. दक्षता व काळजी: बरणीमध्ये सर्व मिश्रण एकाच पातळीत राहील, बरणीच्या काठाला चिकटून राहणार नाही ही काळजी घ्या. शिक्षक कृती: या हस्तपुस्तिकेमध्ये नमुन्यादाखल एका प्रकारच्या लोणच्याची कृती दिली आहे. परंतु प्रत्यक्षात शक्य असल्यास प्रत्येक विद्यार्थ्यास किंवा २-३ विद्यार्थ्यांचे गट तयार करून प्रत्येक गटास वेगवेगळी लोणची तयार करण्यास सांगावीत. ३८