________________
(८) द्रावणाचा रंग - इतर दोन बाजूच्या रंगाशी मॅच होण्यासाठी – DW थेंब टाका व रॉडने हलवा. (९) टेस्ट ट्युबचे रिडींग घ्या. तेच HB प्रमाण पहा. संदर्भ : शिक्षक हस्तपुस्तिका, इ. ९ वी, पान नं. २२७ ते २२९. दिवस : दुसरा प्रात्यक्षिक : लोणचे तयार करणे. प्रस्तावना : बाजारात उपलब्ध होत असलेल्या विविध पदार्थांमुळे मानवाच्या आवडीनिवडी वाढू लागल्या. यातूनच त्याच्या गरजा वाढू लागल्या. यामुळे माणूस दररोजच्या जेवणाचा आनंद वाढविण्यासाठी लोणच्याचा वापर करू लागला. सध्या हंगामानुसार उपलब्ध असलेल्या फळे, फळभाज्यांपासून लोणचे तयार करण्यात येऊ लागले. उदा. आंबा, कैरी, लिंबू, चिंच, टोमॅटो, मिरची इ. पूर्व तयारी : (१) बाजारातून ज्या फळे, फळभाज्यांचे लोणचे करायचे आहे, त्यातील उत्तम दर्जाचा माल खरेदी करणे. (२) लोणचे साठवून ठेवण्यासाठी काचेची किंवा चिनीमातीची बरणी असावी. (३) लोणचे तयार करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य व वापरण्यात येणारी सामग्री एकत्र करावी. शिक्षक कृती: (१) लोणचे तयार करण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगावे. (२) लोणचे कोणकोणत्या फळे, फळभाज्यांचे तयार करता येईल, हे विद्यार्थ्यांना सांगणे. (३) लोणचे तयार करण्याची कृती विद्यार्थ्यांना सांगणे. (४) जी फळे, फळभाज्या पाण्यात धुवू शकतो त्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्याव्यात व जी पाण्यात धुवून वापरू शकत नाही ती धुवू नये. उदा. चिंच. उपक्रमाची निवड : विविध फळे, फळभाज्यांचे लोणचे तयार करून त्याचे योग्य प्रकारे पॅकींग व विक्री करणे. अपेक्षित कौशल्ये: (१) लोणचे तयार करण्याची कृती माहीत असणे. (२) लोणचे तयार करताना लागणारे साहित्य योग्य प्रमाणात घ्यावे. (३) लोणच्यास योग्य अशा फळे, फळभाज्यांची व्यवस्थित निवड करता येणे. विशेष माहिती : लोणच्याचा वापर दीर्घकाळ करता येतो. लोणचे कसे टिकवावे? प्रश्न : गेल्या तीन-चार वर्षांपासून घरी केलेले आंब्याचे तसेच लिंबाचे लोणचे टिकतच नाही. म्हणजे दोन ते तीन महिन्यातच त्याला बुरशी येते. लोणच्याला तेल तर अगदी भरपूर असते. बरणीही अगदी काळजीपूर्वक साफ केलेली असते. लोणचे बरणीतून काढताना व पुन्हा बरणीचे झाकण लावतानाही काळजी घेतली जाते. मग असे का होते? चांगले वर्षभर टिकणारे पण लोणच्याचा भरपूर खार असलेली कृती सांगा? शिवाय ते टिकवायचे कसे तेही सांगा. • साधारणपणे लोणचे टिकण्यासाठी दिलेल्या प्रमाणात मीठ वापरावेच लागते. कैऱ्या वा इतर घटक पूर्ण कोरडे असावेत. पुसून घ्यावेत. • इतर सर्व साहित्य व हातही पूर्ण कोरडे असावेत. ३७