पान:गृह आरोग्य.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पारंपरिक लोणच्यांपेक्षा वेगळी कोणती लोणची घालता येतील, यासाठी विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला पूर्ण स्वातंत्र्य द्यावे. लोणच्याच्या कच्च्या मालाचा खर्च विद्यार्थी स्वतः करण्यास तयार असतील तर त्यांच्या साहित्याचे तयार लोणचे घरी नेऊद्यावे. माहिती: लोणचे जास्त काळ टिकावे यासाठी काही सूचना : रोजच्या वापरासाठी छोट्या बरणीत किंवा चिनीमातीच्या भांड्यात थोडे लोणचे काढून घ्यावे. लोणचे काढून घेताना ओला चमचा वापरू नये. लोणचे काढून घेतल्यानंतर साठवणुकीच्या बरणीच्या काठाला चिकटून राहणार नाही तसेच लोणच्याच्या सर्वात वर तेलाचा तवंग राहील याची काळजी घ्यावी. साठवणुकीची बरणी थंड व कोरड्या जागी ठेवावी. भाज्यांची लोणची जास्त काळ टिकत नाहीत तर आंबा, कैरी, लिंबू, मिरची अशा पदार्थांची लोणची वर्षभर टिकतात हे लक्षात ठेऊन लोणची करावीत. विद्यार्थी कृती : या प्रात्यक्षिकामध्ये तयार केलेल्या लोणच्यासाठी वापरलेल्या साहित्याची किंमत काढून त्यावरून विक्री किंमत निश्चित करा. Spread sheet च्या M.S. Excel सारख्या एखाद्या संगणकीय प्रोग्रॅममध्ये गणिती सूत्रांचा उपयोग करून कॉस्टींग करा. Spread sheet मध्ये एखाद्या वस्तुची किंमत बदलताच विक्री किंमत कशी बदलते याचे निरीक्षण करा. (II) उद्देश : आवळ्याचे लोणचे तयार करणे : साहित्य : १ किलो मोठे आवळे, २५० ग्रॅम मीठ, २५० ग्रॅम तेल, १० ग्रॅम मोहरीची डाळ, १०० ग्रॅम लाल तिखट (थोडे कमी चालेल), ४ चमचे ओवा, ४ चमचे जीरे, ५०० ग्रॅम सैंधव, कृती : आवळे जरा कोचवून दहा मिनिटे वाफवून घ्यावेत. जिन्याची कचीच पूड करावी. चमचाभर तेलात ओवा जरा परतून घ्यावा. मोहरीची डाळ बाजारात मिळते. ती मोठी असते. ती थोडा वेळ उन्हात ठेवून जरा कुटावी. त्यात थोडे (अर्धा वाटी) पाणी घालून फेसावी व त्याची गुळगुळीत पेस्ट करावी. या फेसलेल्या मोहरीत सर्व मसाल्याच्या पुडी, तिखट व हळद घालावी. मीठ मिसळावे. एका स्वच्छ बरणीत तळाला थोडे मीठ घालावे. त्यावर थोडे आवळे घालावे. त्यावर मसाल्याचा एक थर द्यावा. त्यावर पुन्हा आवळ्याचा थर व त्यात पुन्हा मसाल्याचा थर द्यावा. शेवटचा थर मसाल्याचा असू द्यावा. तेल कडकडीत तापवून गार करावे व मिश्रणावर ओतावे. ७-८ दिवस ती बरणी दिवसा उन्हात ठेवावी. पंधरा दिवसांनंतर वापरायला घेण्याजोगे लोणचे तयार होईल. (III) उद्देश: टोमॅटोचे तिखट लोणचे (तोक्कू) तयार करणे: साहित्य : १ किलो लालबुंद टोमॅटो, २ मोठे चमचे तेल, १ चमचा मोहरी, ३ चमचे उडदाची डाळ, २ चमचे तिखट, ३ चमचे मीठ, २ चमचे गूळ, अर्धा चमचा हिंग. कृती: टोमॅटो धुवून पुसून ठेवावे. त्याचे चार किंवा आठ तुकडे करावेत. कल्हईच्या पातेल्यात तेल तापवावे. त्यात मोहरी व डाळ घालावी. डाळ तांबूस झाली की हिंग व टोमॅटो घालावे. जरा ढवळून आच मंद करावी व भांड्यावर झाकण ठेवावे. १०-१२ मिनिटांत पाणी सुटून टोमॅटो शिजत येतील. नंतर त्यात तिखट, मीठ व गूळ घालावा. ढवळून पाच मिनिटे उकळले की खाली उतरवावे. झाकण ठेवू नये. गार झाल्यानंतर लहान बरणीत भरावे. (IV) उद्देश : कारल्याचे लोणचे तयार करणे : साहित्य : ४०० ग्रॅम कारली, ४-५ चमचे मीठ, अर्धी वाटी लोणच्याचा मसाला, २ लिंबे (रस). ३९