पान:गृह आरोग्य.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दक्षता व काळजी: (१) पिपेटच्या मदतीने रक्त ओढून घेताना पिपेटमध्ये हवेचा बुडबुडा राहणार नाही याची खात्री करून घ्या. (२) HCL च्या परीक्षानळीत रक्त सोडताना HCL च्या पातळीपर्यंत पिपेट नेऊन मगच सोडा. परीक्षानळीच्या कडेला लागून रक्त वाया जाणार नाही याची काळजी घ्या. ज्या व्यक्तीच्या रक्ताचा नमुना तपासणीसाठी घेतला असेल त्या व्यक्तीला शरीरात एकूण रक्त किती असते, तपासणीसाठी किती घेतले, काढून घेतलेले रक्त भरून निघण्यास किती वेळ लागतो इ. गोष्टी माहीत नसल्यास समजावून सांगा, गैरसमज पसरण्याचा धोका टाळा. (४) रक्त काढून घेतल्या ठिकाणी स्पिरीटचा कापूस थोडा वेळ ठेऊन द्या व नंतर त्याजागी जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून चिकटपटीचा छोटा तुकडा चिकटवा. शोधून पहा : माणसाच्या शरीरात एकूण किती लीटर रक्त असते, रक्तगट तपासणीसाठी किती रक्त घेतात, रक्तदान करताना किती रक्त दिले जाते, काढलेले रक्त भरून निघण्यास किती वेळ लागतो, रक्त लवकर भरून येण्यासाठी आहार कसा असावा, आधुनिक तंत्र वापरून संपूर्ण रक्ताऐवजी फक्त प्लाझ्मा देण्याची कल्पना काय आहे इ. माहिती मिळवा. HB चे रक्तातील प्रमाण : हिमोग्लोबीन हे द्रव्य रक्तातील तांबड्या पेशीत असते. या द्रव्यामुळेच रक्तातील तांबड्या पेशी 0, वायू शरीरातील सर्व भागांना पोहोचविण्याचे काम करतात व प्रत्येक पेशीतून CO, फुफ्फुसाकडून नेण्याचे काम करतात. HB चे रक्तातील प्रमाण समजल्यास - अॅनिमिया ओळखता येतो. (१) प्रमाण कमी झाल्यास प्रत्येक पेशीला ज्वलन करण्यास ऑक्सिजन कमी पडतो. त्यामुळे थकवा येणे, डोळ्यांसमोर अंधारी, चक्कर येणे, रोग प्रतिकारक शक्ती कमी होणे इ. आजार जाणवतात. प्रयोगशाळेत HB तपासण्याची कृती - तत्त्व – HB हिमोग्लोबीनमध्ये लोह मूळ द्रव्यामुळे लाल रंग येतो. HCIशी प्रक्रिया झाल्यावर अॅसीड हिमॅटीन तयार होते व त्याचा भडक चॉकलेटी रंग तयार होतो. या रंगाची तीव्रता रक्तातील HB वर अवलंबून असते. यात पाणी घालून तीव्रता कमी करून जवळ लावलेल्या रंगीत काचेशी जुळवली जाते. टयुबवर % HB च्या खुणा असतात. रंग जुळविण्यासाठी पाणी घातल्यावर नळीवरील HB% रीडींग घ्यावे. माल : HCI, DW, कापूस, स्पिरीट, शरीरातील रक्त. साहित्य : पिपेट (रबरी नळी सहित), टेस्ट ट्युब, कॅम्पॅरेटर, ड्रॉपर, ब्रश, लॅन्सेट (सुई), काचेचा रॉड इ. कृती: (१) टेस्ट ट्युबमध्ये - २० च्या खुणेपर्यंत HCIघ्या. (२) हाताने (पेशंटचे) बोट – रक्त जागा निर्जंतुक करा, स्पिरीटच्या साहाय्याने. (३) लॅसेटच्या साहाय्याने – बोटाला टोचून रक्त काढा. (४) पिपेटने 0.02 ml. एवढे रक्तघ्या (तोंडाने ओढा). (५) रक्त परीक्षानळीत (टेस्ट ट्युब) मध्ये सोडा. (६) परीक्षानळी हलवा- HCIव रक्त एकत्र होण्यासाठी. (७) परीक्षा नळी कॅम्पेरेटरमध्ये (५ मिनिटे) ठेवा. आकृती