पान:गृह आरोग्य.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गाजर-पालक किंवा लाल माठ, पत्ताकोबी-बीट, टोमॅटो-पालक, टोमॅटो-ओली हळद व सफरचंद यांचे मिश्रण तसेच डाळींब, आवळा, पेरू, डाळिंब व संत्रीचा रस तयार करावा. दररोज सकाळी अर्धा कप प्यायल्याने रक्तदोष दूर होतात. गहू व ज्वारी अंकुर यांच्या रसाला 'संजीवनी रस' ही म्हटले जाते. रक्तातील हिमोग्लोबीनच्या कमी-जास्त प्रमाणाचे शरीरावर होणारे परिणाम - हिमोग्लोबीन हे द्रव्य रक्तातील तांबड्या रक्तपेशीत असते. या द्रव्यामुळेच तांबड्या रक्तपेशी फुफ्फुसातील ऑक्सिजन शोषून घेतात व शरीरातील सर्व पेशींना पुरवतात. तसेच शरीरातील पेशींमध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साईड वायू फुप्फुसात परत आणून सोडतात. हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी झाल्यास शरीरातील पेशींना पुरेसा 0, मिळत नाही व पेशींतील co, शरीराबाहेर टाकला जात नाही. परिणामी, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, अॅनिमिया म्हणजेच पंडुरोग होतो. म्हणून शरीरात हिमोग्लोबीनचे प्रमाण योग्य राखले पाहिजे. पुरुष | 14gm% ते 18gm% म्हणजे दर १०० मायक्रोलीटर रक्तामध्ये १४ ते १८ ग्रॅम हिमोग्लोबीन | स्त्री | 12gm% ते 14gm% म्हणजे दर १०० मायक्रोलीटर रक्तामध्ये १२ ते १४ ग्रॅम हिमोग्लोबीन रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण योग्य राखण्याचे उपाय - आयर्न हिमोग्लोबीनचा एक घटक आहे. लोह किंवा आयर्न (Iron) त्यांच्या वाढीसाठी हिरव्या पालेभाज्या, तूप-गूळ, लोहयुक्त गोळ्या खाव्यात. अन्नपदार्थ बनवताना लोखंडी कढई, तवा अशी भांडी वापरावीत. हिमोग्लोबीन कमी होण्याची लक्षणे - त्वचा फिकट दिसणे, थकवा येणे, अंधारी येणे, चक्कर येणे, लहान मुले किंवा गरोदर स्त्रियांची वाढ खुंटते, पोटात जंत, कृमी झाल्यास सुद्धा हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होते. म्हणून प्रथम जंतनाशक किंवा कृमीनाशक औषध देऊन नंतर हिमोग्लोबीन वाढीचे उपाय योजावेत. हिमोग्लोबीनच्या अहवालात हिमोग्लोबीनची टक्केवारी लिहितात किंवा gm/dl या एककामध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण लिहितात. उपक्रम : (१) गावातील लॅबला भेट देऊन रक्तगटाची माहिती घ्या. (२) हिमोग्लोबीनविषयी सर्व माहिती जाणून घ्या. (३) तुमच्या शाळेतील इतर वर्गातील विद्यार्थ्यांचे हिमोग्लोबीन तपासून पहा. शिक्षक कृती : हिमोग्लोबीन: (१) हिमोग्लोबीनविषयी सर्व माहिती विद्यार्थ्यांना द्या. (फायदे, तोटे, उपयोग इ.) (२) वापरावयाच्या सर्व साहित्याची माहिती द्या. तसेच वापर करताना घ्यावयाची दक्षता विद्यार्थ्यांना सांगा. तुम्ही पॅक्टीकल करून दाखवताना सर्व विद्यार्थ्यांना ते पाहता येईल असे नियोजन करा. त्यांचे गट करा. रक्त काढण्यापूर्वी करून ठेवायच्या गोष्टी पूर्ण आहेत की नाही हे तुम्ही स्वतः पहा. (५) अॅसिडचे प्रमाण बरोबर घेतले की नाही हे तुम्ही पाहून घ्या. (६) पिपेटमध्ये रक्त घेताना बोलू नये. (७) टेस्ट ट्यूबमध्ये रक्त टाकताना पिपेट टेस्ट ट्यूबमध्ये घालून रक्त आत सोडा. (८) डिस्टील वॉटर टाकताना विद्यार्थ्यांना योग्य त्या सूचना सांगा. (९) हिमोग्लोबीन रिडिंग तुम्ही स्वतः पहा व सांगा. (१०) सर्व विद्यार्थ्यांचे दोन दोनच्या जोड्या करून हिमोग्लोबीनचे प्रमाण चेक करा. (११) तुमच्याकडे त्याची नोंद करून घ्या व विद्यार्थ्यांना सुद्धा करण्यास सांगा. ३५