पान:गृह आरोग्य.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गृह-आरोग्य इयत्ता : ९ वी दिवस : पहिला प्रात्यक्षिक : हिमोग्लोबीनचे प्रमाण मोजणे. प्रस्तावना : रक्त हे कृत्रिमपणे तयार करता येत नाही. सर्व व्यक्तींच्या रक्ताचा रंग हा लाल असतो कारण रक्तामध्ये लाल रक्त पेशींचे प्रमाण सर्वाधिक असते. या पेशीमधील हिमोग्लोबीन या घटकामुळे रक्त लाल रंगाचे दिसते. हिमोग्लोबीनमुळे प्राणवायू व कार्बन डायऑक्साईड रक्तात विरघळू शकतात आणि त्याचे वहन करणे सुलभ बनते. पांढऱ्या रक्त पेशींमुळे रोग संसर्गाला प्रतिबंध होतो तर बिंबिकांमुळे रक्ताची गुठळी होण्यास मदत होते. शरीरामध्ये हिमोग्लोबीनचे अधिक महत्त्व आहे कारण जर हिमोग्लोबीनचे प्रमाण हे शरीरामध्ये योग्य असेल तर व्यक्ती नेहमी उत्साही राहते. पूर्व तयारी : हिमोग्लोबीन तपासणीसाठी लागणारे सर्व साहित्य आणून ठेवा. (N/10 SCL, लँसेट, कापूस, स्पिरीट, पिपेट, हिमोग्लोबिनोमीटर, ब्रश, टेस्ट ट्यूब HB). उपक्रमाची माहितीः (१) शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या हिमोग्लोबीन तपासणी करा. (२) गावातील पॅथालॉजी लॅब किंवा सरकारी दवाखान्याला भेट द्या. (३) सरकारी डॉक्टरांच्या मदतीने गावात हिमोग्लोबीन तपासणी कॅम्प घ्या. अपेक्षित कौशल्ये: (१) मुलांना चांगल्या प्रकारे प्रिक करता येणे, (२) पिपेटमध्ये रक्त व्यवस्थित ओढता आले पाहिजे. (३) दिलेल्या रक्त नमुन्यातील हिमोग्लोबीनचे प्रमाण विद्यार्थ्याला तपासता येणे. विशेष माहिती : हिमोग्लोबीन हा मुख्यत: ऑक्सिजनच वहन करत असल्याने, शरीरातील हिमोग्लोबीन जर कमी झाले तर मनुष्यास सतत आळस येतो. फारच कमी झाल्यास चक्कर येते. शरीरावर तेज रहात नाही. तसेच हे जर वाढवायचे असेल तर लोहयुक्त पदार्थ सेवन करावे. उदा. पालेभाज्या, शेंगादाणे, गूळ इ. हिमोग्लोबीन चेक करताना प्रिक करण्याअगोदर HCL टेस्ट ट्यूबमध्ये घेऊन ठेवा. प्रिक केल्यावर HCLघेऊ नका. पिपेटमध्ये रक्त ओढताना हळुवारपणे ओढा. रक्त पिपेटमध्ये ओढताना हवेचा बुडबुडा येऊ देऊ नका, रक्त टेस्ट टयूबमध्ये सोडताना हळुवारपणे सोडा. दक्षता : (१) एका व्यक्तीस एकच लँसेट वापरा. (२) रक्त काढताना नखाजवळ प्रिक करू नका. शेंड्यावर प्रिक करा. (३) पिपेटमधील रक्त Hb टयूबमध्ये टाकल्यावर पिपेट लगेच स्वच्छ करा. (४) हिमोग्लोबिनोमीटर पाहताना उजेडाच्या दिशेने पहा. (५) पिपेटमध्ये रक्त ओढताना रक्त तोंडात जाणार नाही याची काळजी घ्या. विशेष माहिती : रक्त शुद्धीसाठी फळे, पालेभाज्या यांचा रस फार उपयुक्त असतो. शरीरातील रक्तवृद्धी व शुद्धीसाठी मेडिकलमधून सायरप आणण्याची आवश्यकता नाही. घरच्या घरी फळे, हिरव्या पालेभाज्या यांचा रस काढता येतो. दररोज अर्धा ग्लास रस घेतल्याने आपल्या शरीरातील उष्णता कमी होते,